पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. घोंगडीवर बसली आहे वाटते. अगबाई, मला याने पाहिले वाटते? काळजांत कसें धस्स होत आहे. माझें तोंड कां कोरडे पडलें बरें ? तुकाराम-कोण आहे तिकडे ? ( जोरानें ) कोण आहे बोलत कां नाहीं? सुंदराजी-म्हटले मी आपलीतुकाराम-माझी कोण ? सुंदराजी-मी आपली सुंदरी आहे. ( हळूच ) कांहीं नाजूक काम आहे, म्हणून इतक्या रात्रीं आलें. दिवसां कांही आपली भेट एकांतांत होत नाही म्हणून मुद्दाम रात्री आपल्या कीर्तनास येऊन इतका वेळ जागून आपल्या मागोमाग आपल्या घरी आले. तुकाराम-पण आहो बाई, तुमचे काम काय आहे ? सुंदराजी-पण इथे कोणी दुसरे तिसरे आहे का ? तुकाराम-तुमचे काम काय आहे एवढ्या रात्री ? सुंदराजी-पण जिजाई, तुमची बायको कदाचित्तुकाराम-काय तुमचे तिचे भांडण झाले होय? ती फ भांडखोर आहे. सुंदराजी-तशांतला काही प्रकार नाही. तुम्ही खाली बस मी सांगते. ( मुरका मारून ) पण किनई बाई, मला बोलायची लाज वाटते. तुकाराम-(एकीकडे ) या बाईच्या एकंदर आचरणावरून ही गैरचालीची दिसते. इतक्या रात्री येथे येण्याचे कांहींच कारण नाही. हिचे नाजूक काम माझ्याबरोबर कशाचे आले आहे ? नको, स्त्रियांची संगती नको ! त्या लाकडाच्या आणखी दगडाच्या असल्या तरी सुद्धा मनाला भूल पाडतील. मग जीवंतच असल्या तर काय नाही करणार ? शुकाचार्याने रंभेची निर्भर्त्सना करून जेव्हां तो तपास गेला तेव्हा आम्ही होतो. ( उघड ) बाई, तुम्ही कां आलांत ते मी समजलों. पण तुमचे काम माझ्या .... हातून--