पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. अंक तिसरा प्रवेश १ ला. स्थळ-तुकारामाचें घर. ( सुंदराजी प्रवेश करते.) सुंदराजी-आह्मां स्त्रियांपुढे पुरुषांचे काही चालत नाही. आम्हांला पुरुष आपले सामान्य समजतात, परंतु आम्ही म्हणतों आमच्या इतके थोर कोणीच नसेल. तारुण्य आणि स्वरूप ही जर आम्हास अनुकूल असतील, तर आह्मी इकडची दुनिया तिकडे करूं. मोठमोठ्या राज्यांच्या उलथापालथी करूं. आमच्या प्राप्तीकरितां आजपावतो कितीएक लोकांचे खून झाले असतील, कितीएक लोक आपल्या आईबापाना, बायकामुलांना, घरादारांना. दमि. यांना किंवा राज्यवैभवाला सुद्धां आंचवले असतील. पतंग जसा दिव्याच्या जोतीवर झडप घालतो तसे कामी तरुण पुरुष विषयवासना तृप्त करून घेण्याच्या लालसेने आमच्याशी लगट करतात पतंगाचा जसा परिणाम आपला सर्वस्वी नाश करून बेपयांत होतो तसाच विषयी पुरुष आमच्या संगतीनं आपल्या जीविताला आंचवतो. या तुकारामाची कथा काय ! जराशी गालांत हंमून थोडासा मुरका मारून चंचल अशा दृष्टीने त्याचार पाहिले की त्याच्या वैराग्याचे पाणी होऊन जाईल. कार माझ्या मागे मागे सुंदराजी सुंदराजी करीत हिंडायला लागेल. विश्वामित्र गेला की नाहीं कुत्रं होऊन मेनकेच्या मागें? सांब की नाही भिल्लिणीच्या मागे? हेच तुकारामाचें घर. तो देखनातन घरी येत असतां मी पाळत ठेवून त्याच्या मागोमाग चोराप्रमाणे आलें. (घरांत प्रवेश करते.) स्वारी चांदण्यांतच