पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. अनुतापाच्या ज्वालेत देहबुद्दीचें हवन केले; अहंता आणि ममता यांचे बीज खणून काढून ज्याने शांतीचें पाणिग्रहण केलें; हरिभक्तीचा महिमा दिगंत वाढवून ज्याने ज्ञानाचा ठेवा जगाला उघडून दाखविला; दुर्जन आणि निदंक यांच्या संशयाचे निरसन करून ज्याने सर्व जगाच्या उद्धाराचा मार्ग दाखविला; श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी ज्या भक्तिरूप मंदिराचा पाया घातला, नामदेवाने ज्या मंदिराचे आवाराची रचना केली, जनार्दनाच्या एकनाथाने ज्या मंदिरावर आपल्या भागवत ग्रंथाचा ध्वज उभारिला, अशा मंदिराच्या शिखरावर जो कळस होऊन बसला; ज्याला प्रयाणकाली श्री पांतरंगाने विमान पाठविलें; आणि जो सकल संतांना तोपवून मानवदेह येऊन श्रीरामचंद्राप्रमाणे निजधामाला गेला; अशा श्रीतुकाराममहाराजाचें चरित्र नाटकरूपाने मार्मिक जनापुढे मांडण्यास त्याच्यासारखाच थोर मनाचा आणि कुशाग्र बुद्धीचा साधु पुरुष पाहिजे होता. परंतु: आणि क्षीरसिंधुचिया तटा । पाणिया येती गजघटा। तेथे काय मुरकुटा । वारिजत असे ॥१॥ पांख फुटे पाखिलं । नुडे तरी नभींच स्थिरू ॥ गगन आक्रमी सत्वरु । तो गरुडही तेथ ॥ २ ॥ राजहंसाचे चालणे । भूतळी जालिया शहाणे ॥ आणिके काय कोणे । चालवेचिना ॥३॥ जी आपुलेनि अवकाशें । अगाध जळ, चेपे कलशं ॥ चुळी चूळपणा ऐसें । भरुनि न निघे ॥४॥ दिवटीच्या आंगी थोरी । तरि ते बहुतेज धरी॥ वाती आपुलिया परी । आणीच की ना ॥५॥ जी समुद्राचेनि पैसें । समुद्री आकाश आभासे ॥ थिल्लरी थिल्लरा ऐसें । बिंबेचि पैं ॥६॥ जिये सागरी जळचरें । संचरती मंदराकारें ॥ * माजी डायरेक्टर सर आलेक्जांडर ग्रांट्साहेब यांनी प्रस्तुत कवीचे अभंग छापण्यास २४००० रुपये दिले व ते अभंग दोन भाग मिळून छापून प्रसिद्ध झाले आहेत, हेही पुष्कळांस महशूर असेलच.