पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. नाही म्हणाले. आम्हांला तुमचे स्वाधीन केले आहे. राज्य नको, संसार नको, आईबापाची, कुटुंबाची गरज नाही, अशी त्यांची वृत्ति बनून गेली आहे ! आम्ही आता काय करावे? तुकाराममहाराजांचे उपदेशाने त्यांना राज्याचा व संसाराचा वीट आला ते ईश्वरभजनीं लागले. जिजाबाई-हाय हाय! मला आतां आई म्हणून गोड हाक कोण मारील? माझ्या पोटी एकच पुत्र. तोही विरक्त होऊन वनांत गेला. त्याच्या पोटी एक मूल सुद्धा नाही. कोणच्या रीतीने मी आपलें समाधान करावें? मी अंध झाले. शिवाजीशिवाय पंगु झाले. माझी आंधळ्याची काठी परमेश्वराने हिसकून घेतली. रामा, तूं जसा वनवासास गेलास, दशरथाने जसा राम राम करून प्राण सोडला%3B तसा विजापुरास ही हकीकत समजली म्हणजे शिवाजी शिवाजी करून प्राण टाकतील! माझ्या लाडक्या, आणखी मी कशाला जगते? रामाच्या वियोगानें कौसल्येचें अंतःकरण जसें व्याकुळ झाले, तसे शिवराया या तुझ्या आईचे अंतःकरणाला तापलेल्या लोखंडाच्या सांडसाने कोणी डागण्या देत आहे असे वाटते. एकदां तरी मला येऊन भेट. मला तुझ्या गळ्यास मिठी मारूं दे, तुझें तोंड कुरवाळू दे, मी आतां जगत नाही. ( मच्छ| येऊन पडते.) सईबाई-हे मी काय पहात आहे! मूर्य मावळल्यावर त्याची प्रभा मागे रहाते काय? त्यांच्यावरीज या जगांत सर्वत्र अंधार दिसतो आहे. भेट सुद्धा झाली नाही. भेटीची आशा राहिली. ते माझा प्राण! ते आत्मा, मी कुडी! प्राण गेल्यावर शरीरांत काय आहे? तें धरणीवर पडणारच. आतां विवेक होत नाही. जिकडे जाणे झाले आहे तिकडेच आतां मी जाते. (मूच्छित पडते. तानाजी, पंडितराव, रंग, गंगू दुःखाने हातावर कपाळे टेंकन चसतात. सर्वांचे लक्ष चोरुन सईबाई वनांत निघून जाते.) [अंक दुसरा समाप्त ]