पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ श्रीतुकाराम. पंडित०-महाराज, कापराच्या राशीवर ज्याप्रमाणे अग्नि ठेवावा त्याप्रमाणे मराठ्यांच्या वैभवाचा कळस केलात. आम्हाला कोणी त्राता नाही. गोब्राम्हणाला कोणी या जगांत वाता नाही. आम्ही आपलीं लेंकरें, आपल्याशिवाय आमचे प्राण वाचणार नाहीत, आम्हीही महाराजांशिवाय आमची काळी तोंडे घेऊन मातुश्रीकडे जाणार नाही, आम्ही आपल्यास जाऊंच देणार नाही, मातुश्रीपर्यंत चलावें, नंतर जावें. शिवाजी-( हंसतो.) तुकाराममहाराजांचे उपदेशाप्रमाणे ही काया ब्रह्मरूप करणार. तुमच्या भाषणाचा विचार करण्यास मन जागा देत नाही. आम्ही चाललो. (तानाजी व पंडितराव यांना लोटून जातो.) तानाजी-हाय हाय ? गेले महाराज आमचा त्याग करून. पार दिसेनासे झाले. तुकाराममहाराज, हे काय केलेत ? फिरून आमचे महाराज आले नाहीत तर या तरवारीने आह्मी आपल्या माना सपासप उतरून घेऊ. पंडितराव, चला आपण महाराजांच्या मागोमाग जाऊं. ( जिजाबाई, सईबाई, रंग, गंग वगेरे प्रदेश करितात.) जिजाबाई-तानाजीराव, पंडितराव, शिवबा कोठे गेला ? कोठे आहे माझा बाळ ? तुमची तोंडे अशी हिरमुसलेली कां? तुम्ही असे रडतां कां? बोला लवकर. त्याला मोगलांनी धरून नेला का? धीर निघत नाही. काही तरी विपरीत गोष्ट घडून आली आहे. सईबाई-माझ्या काळजाने ठाव सोडला, स्वारी इथे दिसत नाहा. तानाजाराव कसाहा प्रसंग आला तरीन असे असून तो सुद्धा रडतो आहे ! काय माझ्या कपाळी आहे कोण जाणे! आई अंबाबाई, आम्हांला या संकटांतून पार पाड. तानाजी-आईसाहेब, महाराजांनी राज्याचा त्याग करून वनवास धारण केला. आताच आम्हांला सोडून विदेही होऊन तपश्चर्या करण्याकरितां अरण्यांत गेले, व पुनः आतां परत येणार