पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. अगदी अंध झालों, पंगु झालों, माझ्या मनाला शांतता उत्पन्न करा. तुकाराम-या सुंदर शरीराची उद्यां वाळून काचरी होईल. पंचविशी गेली, चाळिशी गेली, दाढी पांढरी झाली, दांतांडवाडी ओस पडली, नाकपुर वाहूं लागले, कानपुराचे वेशीत दट्टे मारले, हातापायांच्या काड्या होऊन कमळाप्रमाणे नेत्र अंध झाले; मग आपल्या हातून काय होणार ? अंती आपल्यास कोणी सोडविणार नाही. ज्या राजधानीत सात कोट घरें शुद्ध कांचनाची असून जिला समुद्राचा वेढा होता, जिच्या संरक्षणाकरितां मदोन्मत्त निशाचर, ज्या राजाची कामाची शांती करण्याला ऐशी हजार स्त्रिया तयार, ज्याची पट्टराणी मंदोदरी, इंद्राला पादाक्रांत करणारा ज्याचा पुत्र, कुंभकर्णासारखा बंधुवर्ग, ज्याला चौदा चौकड्यांचे आयुष्य, ज्याचे घरी तेहतीस कोट देव राबत होते, अशा रावणाबरोबर एक कवडीसुद्धा गेली नाही. त्याचा प्रचंड देह कधीच धुळीला मिळून जाऊन त्याजवर घोर जंगल माजलें आहे. ( शिवाजी तुकारामाचे पायावर मस्तक ठेवून जाण्याची परवानगी घेतो. तुकाराम उठून जातो.) राम शिवाजी-बस. आपले काम झाले. आतां राज्यप्राप्तीची गरज राहिली नाही. शत्रूचे पारिपत्य करून गड, कोट, किल्ले घेण्याची आतां जरूर राहिली नाही. संसारापासून अलिप्त झालो. सर्वसंगपरित्याग करून आतां वैराग्य धारण करणार. या भूषणांची, या मौल्यवान वस्त्रांची आतां जरूरी नाही. तानाजी, संभाळा आता आपली ही तरवार. घ्या ही आपली वस्त्रे-भूषणे. तुमची आमची हीच भेट. आतां संबंध उरला नाही. ( वस्त्रे भूषणे काढून फेंकून देतो.) आम्ही श्रीरामचंद्राप्रमाणे राज्याचा त्याग करून वनांत जाणार. झालेली हकीकत मातुश्रीस निवेदन करा. तानाजी-महाराज, हे काय ? आम्हांस कोणाचे स्वाधीन करतां ? मराठ्यांच्या गादीचा मालक कोण ? चाललांत कोठे ? आम्ही जाऊ देणार नाही.