पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. णाने डुलत आहेत, जे देहींच विरक्त, उदास, आणखी ज्यांना विषयांची आठवण नाहीं, तेच संत. शिवाजी-ब्रह्मज्ञान कशाला म्हणावें महाराज ? तकाराम-( हांसतो.) शिवाजी, ब्रम्हज्ञान असे जर एका घटकेंत समजं लागलं तर वेद, शास्त्रे, ब्रम्हज्ञानाच्या पुढे कुंठित कां झाली असती ? ब्रम्हज्ञानाचे प्राप्तीकरतां शास्त्रांचे अध्ययन करटात, जप करतात, तप करतात, तीर्थयात्रा करतात, याचकरतां व्यासांनी भागवत केलें. असो, तुमची इच्छा आहेच तर मी आपल्या अल्प मतीप्रमाणे सांगतो.-ममतेचा मळ अंगाला लागू नये. निरिच्छ असावें. पांडुरंगाचे ठिकाणी मन निश्चल असावें. इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, सूर्य जसा रसाचे शोषण करतो परंतु गुणदोष जसे त्याच्या अंगीं जडत नाहीत, त्याप्रमाणे सर्वांवर समत्व राखणे. कोणाविषयीं आपपरभेदाभेद नाही. मनांत कोणत्याच गोष्टीचा संकल्प येत नाही. आणखी मनांत किंचित्सुद्धां गर्व नाही. नेहमी आनंदी आणि प्रसन्नवृत्ति असावी यालाच अद्वैत खरें ब्रह्मज्ञान ह्मणतात. बाकी सर्व अनुभवावांचून बडबड. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. श्री रामदासस्वामी यांचे ठायीं हे ज्ञान पूर्णपणे वसत आहे. तुमी त्यांची सेवा करावी. झणजे तुम्हास ब्रम्हज्ञानी म्हणतील. पण आश्चर्याची गोष्ट ही की, आज हा किल्ला घेतला, उद्या त्या किल्ल्याला शह दिला, आज विजापुरावर हल्ला कला, उद्या दिल्लीवर ढाला फिरविला पकड, लूट, जाळ, उडव फन्ना. अटकेवर झेंडा फडकावीन, हिंदु डीची टोलेजंग इमारत उभारीन म्हणून ज्याचे बाहु त आहेत, अंगी पहिल्या पंचविशीची भरज्वानी, सौंदर्य मदनासारखें, आणि अजुनाप्रमाणे पराक्रम, अशा पुरुषाच्या निष्पाप शारीर तप घडून तो आपल्या देहाचें सार्थक कसे या चित्तवृत्ति एकाग्र होऊन ईश्वरमय होऊन जाणार कशा ? शिवाजी-महाराज, मला आता काय करावेंतें सुचत नाही. मी