पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. च्या गोळ्याचे तुकडे तुकडे झालेले पाहिले असते, म्हणजे त्या पांडुरंगाच्या नांवाला काळोखीच लागली असती ह्मणावयाची. तुकारामाचें नांव निघालें तर सचैल स्नान करावे, असा लोकांचा ग्रह झाला असता. देव भक्तांचा कैवारी कसा असतो याचें हें प्रत्यक्ष उदाहरण पहा. शिवाजी-महाराज, हा सर्व आपल्या पायाचा प्रताप आहे. चमत्कार कसा झाला हे मला काहीच कळत नाही. आतां महाराजांनी मला संत म्हणजे काय व तें पद धारण करण्यास कोण समर्थ होतो, त्याचप्रमाणे ब्रम्हज्ञान म्हणजे काय हे सांगावें. तुकाराम-संतांचा महिमा वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. तथापि मूल जसे बोबड्या भाषणानें बापाच्या जीवाला समाधान उत्पन्न करितें, तसा आपणही संतांचा महिमा जाणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या पायांच्या कृपेने आपल्यास संतांच्या स्वरूपाचें थोडे तरी ज्ञान होऊन बापाप्रमाणे संतांनांही आपल्या कृतीचे समाधान वाटेल. शिवाजी-महाराज, संताचे स्वरूप कसे असते ? आपण त्यांना कसे ओळखावें ? पुष्कळ कवित्व केले किंवा संतांच्या कुळांत जन्म झाला असला, तर तो संत होईल किंवा नाही ? तुकाराम-पुष्कळ कवित्व केल्याने किंवा संतांचा आप्त असल्याने तो संत होत नाही. हातांत भोपळा घेऊन ठारोदार भिक्षां देहि । केल्याने, भस्माचे उद्धृलन केल्याने, माळा-मुद्रा धारण केल्याने, ईश्वरास न ओळखतां नुसत्या वेठपठणानें, सर्वसंग परित्याग करून रानोरान भटकत फिरल्याने संत होत नाही. ज्याने आपल्या देहावर तुलसीपत्र ठेविलें, जे देहाच्या ठिकाणी उदास, ज्यांना कशाची आशा नाहीं, नारायण हाच ज्यांचा विषय, ज्यांचे आई, बाप, बायका, पोरें, धन, दौलत यांचे ठिकाणी मन नसते-परंतु एक परमेश्वराकडे ज्यांचा हेतु गुंतन राहिला आहे, जे कायावाचामनेंकरून तृप्त होऊन, नामस्मर