पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. णागवर परचक्र ! देवा, आजतागाईत तुझी जी एकनिष्ठपणानें सेवा केली त्याला काळोखी आणलीस. हरिकथेचे चांगले फळ दिलेंस, याचप्रमाणे भक्तांचा उद्धार करतोस काय ? धिःकार असो अशा दवाला आणखा त्याच्या भक्तांना. या नेत्राने शिवाजीला करताना पहाणे हेच आमचे मरण ! पांडुरंगा, तुला हे समजले पाहिजे काय ? इतकें तरी कशाला ? भजनांत विक्षेप हेंच आह्मांका मरण. या तुकारामाच्या कीर्तनांत शिवाजी आणखी त्याचे जिवलग दोस्त तानाजीराव, पंडितराव यांची कतल होऊन या तुकारामाच्या नांवाचा बदनामीचा डंका सर्व दुनियेत वाजण्यापेक्षां या तुकारामासुद्धां सर्वांच्या गर्दना छाटल्या जाऊंदे, आणखी ज्या ठिकाणी भक्ताला आघाताचा वारा लागणार नाही त्या ठिकाणी आम्हांस जन्मास घाल. शिवाजी राजे, कीर्तनांतून उठू नये अशी धर्मनीति आहे. तुह्मीं स्वस्थ असावें. देवाला भक्तांची लाज असली तर संकट दूर करील. तुह्मी धर्मनिष्ठ आहांत, शूर आहांत. शिवाजी-आपल्या वचनावर भरंवसा ठेवून मी स्वस्थ आहे. मस्तकावर पर्वत कोसळला तरी डगमगत नाही. तशांतून आज काशी आहे. आपल्यासारखे वैष्णवजन माझ्या सन्निध आहेत. प्रसंगी कीर्तनांत मरण आल्यास मी आपणास भाग्यवान् समजतो. तानाजीराव, पंडितराव, तुझी अगदी स्वस्थ बसा. ( सर्व बसतात. पडद्यात शब्द हाता “ ए देख शिवाजी तमारेमा पर सवार होके तुमारे छातीपरसे चले जाता हय." पहिला रिसालदार-(जोराने) ओ देखो शिवाजी अपने सासे नंगी समशेर हातमे धरके घोडेपर बैठके भागता हय. पकडो उस्कु चलो. दवडो. (पळत जातात.) राम-आंधळ्या माणसांनां प्रत्यक्ष सूर्य सुद्धा दिसत नाही. पठाणांनां शिवाजी कांहीं दिसला नाही. आज परमेश्व बाजीमहाराजांना जीवदान देऊन या तुकारामाचा माथा उजळता केला. तुमची मातुश्री येथे येऊन तिने आपल्या पोट तसा