पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. तंगडी धरतें एका हातांत आणि एका हातांत घेते जोडा. पोरग नेऊन त्याच्या पायावर आपटतें आणखी चांगला सूड घेतें. नवरा माझा वेडा केला, आणखी कारट्याला मरूं घातला आहे. मुरदंगासारखें त्याचे पोट फुगले आहे, त्याला लघ्वीला होत नाही. हातपाय गार पडले आहेत. तुकाराम-माझ्या टाळक्यांत पाहिजे असल्यास पन्नास जोडे मार; पण देवावर जोडा उगारतेस? तत्काळ जळून जाशील. पोरग देवळांत ने, तुला काय पाहिजे तें कर, पण तो जोडा आण इकडे. जिजाई-कारट्याला त्या काळ्यावर नेऊन आपटते आणखी वर हा जोडा मारतें. ( मुलाला फर फर ओढीत नेते, तुकाराम धांवून जोडा हिसकावून घेतो. शिवाजीचा हात धरून त्यास आपल्या शेजारी आणून बसवितो. शिवाजी तुकारामाचे पायां पडून हात जोडून बोलतो. तानाजी जवाहिराने भरलेले ताट पुढे ठेवतो.) शिवाजी-महाराज तीनचार दिवस कीर्तन ऐकून या मनावर नानाप्रकारचे तरंग उद्भवू लागले आहेत. गुरुदास्य करावें, संतसेवा करावी, माझ्या हातून कांहींच होत नाही. वैराग्य धारण करून वनांत जाऊन इंद्रियांचे दमन करणे माझ्या हातून होत नाही. तीर्थयात्रा कराव्या तर मन शुद्ध नाही. व्रतवैकल्य करावे तर त्याचा विधि ठाऊक नाही. हृदयांत देव आहे ह्मणूं, तर आपपरभेदाभेद मनांतून नाहीसा होत नाही. तात्पर्य, कांहींच कळत नाहीं, कांहीं हातून होतही नाही, ह्मणून महाराजांना केवळ शरणागत आहे. आपल्या पायाचा दास आहे. तुकाराम-(शिवाजीचे पाया पडतो. शिवाजी अनमान प्रदर्शित करतो.) शिवाजी, आह्मी पंढरीचे वारकरी. आह्मी असे समजतों की, सर्वांभूतीं ईश्वर भरलेला आहे. ह्मणून राव किंवा रंक दोन्ही आह्मांस सारखे. दोघांचेही आह्मी पायां पडतो. तुझी द्रव्य पुनः पुनः कशाला आणतां? आमा वैष्णवांनां सोने आणखी माती सारखीच आहे. धनद्रव्य गोमांसाप्रमाणे