पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. in गww आहे. आमचा ठेवा कायतो पांडुरंग हाच आहे. तो आमचा पाठीराखा असल्याने त्रिभुवनीचें राज्य आज आमीच करीत आहों. धन, सत्ता आणखी बळ यांत कायतो राजाचा थोरपणा, पण त्या तिहींतही आह्मी राजाहून श्रेष्ठ आहों. आमची इच्छा पूर्ण करणे असेल तर तुमच्या मुखांत नेहमी हरीचें नाम असूं या. गळ्यांत तुळसीची माळ मिरवा. एकादशी व्रत करा. आणखी हरीचे दास म्हणवा. त्यांत आमचे चित्तास संतोष आहे. ( आपल्या गळ्यांतील एक माळ काढून त्याचे गळ्यांत घालतो, पडद्यांत दंगा होतो.) शिवाजी-तानाजी काय दंगा आहे ? तानाजी-सरकार, चाकणच्या ठाणेदाराकडून आपल्यास धरणे येवून सुमारे दोन हजार पठाण घोडेस्वारांनी आपल्यासभोवती गराडा घातला आहे. प्रसंग आणीबाणीचा आहे. आपण नेहमी तुकाराममहाराजांचे कीर्तनास रात्रीचे येत असतां, याची पाळत ठेऊन त्या ठाणेदाराने ही संधि गांठली आहे. या वेळी त्या पठाणांचे तोंडावर जाण्याकरतां सरकारांनी मला आज्ञा द्यावी माया देह जमीनदोस्त होईपावेतों सरकारांनी पंडितरावाच्या साह्याने पुण्याचा रस्ता धरावा. दोन हजार पठाण झणजे सरकाराला जबरदस्त वाटत असतील, परंतु स्वामींच्या आशीर्वादाने आणखी सरकार रच्या पायांच्या कृपेने दोन हातांत पट्टे चढवून दोन हजार पा वर तुटून पडतों. शीर धडावेगळे झाले तरी माझें कबंध शें दोनों पठाणांच्या गर्दनी छाटील. (जाण्याचे अवसान दाखवितो.) पंडित-मीच पठाणांच्या अंगावर चालून जातो. तानाजीराव, नही महाराजांना संभाळून पुण्यास घेऊन जा. स्वामिका- देह लावण्याचे प्रसंग वारंवार येत नसतात. सरकारांनी मला या वेळी मान यावे, म्हणजे या पंडितरावाच्या जन्माचे सार्थक झाले. अथवा तानाजाराव आणि मा आम्ही दोघे चालत कारांनी पुण्याचा रस्ता धरावा.