पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ श्रीतुकाराम. डोळ्याच्या वैद्याने काय होणार आहे ? तूं आपली स्वस्थ ऐस. मल मेलें तर झालेच नाही असे समजावें. किंवा ज्याने दिलें तो बेऊन गेला. यांत कोणाच्या बापाचे काय गेले. जगलंच तर तुला आनंद आहेच. मला जगणे आणि मरणे दोन्ही सारखीच वाटतात. वैद्याला पैसे द्यावयाचे त्याच्यापेक्षा त्याच पैशाचा देवाला नवद्य केला तर चांगलें. जिजाई-देवाच्या बापाने ठेवलेत नैवेद्य आणि पूजा. कारट्याचे माझ्या प्राण कासावीस होत आहेत. रात्रंदिवस त्याच्या उशाशी मी बसले आहे. सटवाईचे, ह्मसोबाचे, आंबाबाईचे अंगारे लावते, पंचाक्षरी सांगतात की, त्याला पिशाच्याने झपटले आहे, हडळ लागली ह्मणून, त्यांचे गंडे भालदोया अंगारे सारखे चालले आहेत. मुलाच्या अंगावरून नानाप्रकारची सानी उतरून टाकतें आहे. जोतिषी सांगतात की, त्याला ग्रहांची पीडा आहे. साडेसाती मागे लागली आहे. (डोळ्यांस पाणी आणून) लम्वी होतांना पोराच्या समळ्या अंगाला तिडका लागतात; पोर माझें माशासारखें तरफडत आहे. त्याच्या तोंडाची मोरी करून त्याला औषध पाजतें आहे, आणखी तुझाला त्या काळ्याला नैवेद्य कराया - चते काय ? ( मोठ्याने ओरडून ) हडळ लागली मुलाला ! साडेसाती लागली! तुकाराम-तूंच जीवंत हडळ आहेस आणखी साडेसाती आहेस, मग दुसऱ्या हडळीचा आमच्या घरांत प्रवेश होणार तरी कसा? जिजाई-मी हडळ आणि तुझी खवीस. मी साडेसाती आणि नयी शनैश्चर. माझा खेटर अडलाय त्या काळ्याला नैवेद्य करायाला. -नैवेद्य करूं नको आणखी माझ्या पांडुरंगाला शिव्याही पण देऊ नको. जिजाई-शिव्या ? नुसत्या शिव्यांनी काय होतय ? कारट्याची