पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. -० THE ELEMENTS. So mixed in him that Nature might stand up And say to all the world, “This is a man." SHAKESPEARE. स्वात्मानुभव पहातां तुकाया केवळ सखाचि जनकाचा ॥ वैराग्ये डोलविला माथा जेणे मुनींद्र सनकाचा ॥१॥ मोरोपंत. तुकायासि कोठे तुकाया दिसेना। जनी हिंडतांना तुकावा दिसेना॥ तुकावा कसा तो चतुर्भुज जाला। निराकार ब्रह्मीं स्वरूपी मिळाला।। वामन. तुका हा तुका हा परब्रह्मरूपी। तुकीतां तुका तूकला सस्वरूपी ॥ बुकास्वामितें नाम वाचेसि गातां । बहूसा निळा पावला वर्म हाता॥२॥ ' निळोबाराय. ज्याने कामक्रोधादि षड्रिपूंना बंदीत टाकलें; ज्याने आपल्या प्रखर वैराग्याने राजलक्ष्मीस तृणवत् मानले; ज्याने इंद्रियांचे दमन करून मानसाने ब्रह्मांडास कवळून धरलें; संसारसुखाला लाथ मारून ज्याने वासनेचे बीज जाळून टाकले ज्याने विषयवासनेने जर्जर आणि त्रस्त झालेल्या जीवांना आपल्या सरल, औत्सुक्यपूरक आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या, नवनीतापेक्षां मृदु परंतु विद्युत्प्राय भेदकता जिची आहे, अशा, प्रेमानें तल्लीन झालेल्या अंतःकरणापासून आपोआप बाहेर पडलेल्या वाणीने शांत आणि चिरानंद प्रदेशांत पोहोचविलें; ज्याने आपल्या पवित्र आचरणाने व प्रसादयक्त आणि स्वयंभू काव्याने संपूर्ण भारतीय जनालाच काय परंतु ज्यांच्या राज्यावर भगवान् सविता अंतर्धान पावत नाही, अशा आंग्लदेशीय जनाला सुद्धा तल्लीन करून टाकले, इतकेच नाही, परंतु जो आपल्या आयुष्यक्रमांत धनद्रव्याला मृत्तिकेची उपमा देत होता, त्याचीच कवितावधु भाषांतररूपाने आंग्लदेशांतील पुस्तकालयांत विराजमान अंक २ रा. प्रवेश ४ था शेवटी घातलेला आहे.