पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा.. ४३ गोष्टी आमच्या हातून होणेच कठीण. आम्हांस ईश्वर पावणार कसा ? मोठे राज्य कमावलें, देश स्वतंत्र केला, यज्ञयाग केले, गोब्राम्हणांचा प्रतिपाल केला, आणखी या पुण्याच्या जोराने स्वर्गप्राप्ति झाली, म्हणजे कांहीं नरदेहाला येऊन जन्माचे सार्थक झालें असें नाही. तुकारामबुवा तर स्वर्गप्राप्तीला कवडीची किंमत देत नाहीत. आत्मज्ञान झाले पाहिजे, सगुणभक्ति करून परमेश्वराला ओळखिले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे असते. संत कोणाला म्हणावें, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्मज्ञान म्हणजे काय, संतपणा मिळण्याला काय उपाय करावा, वगैरे विचार मला त्यांच्याकडून समजावून घ्यावयाचे आहेत. आतांशा रात्रंदिवस मनाला हीच तळमळ लागली आहे. आजपावेतों कांहीं केलें नाहीं याजबद्दल पश्चात्ताप वाटत आहे. पण आतां बोलून काय उपयोग ? तानाजी आणखी पंडितराव आलेच वाटते. (तानाजी व पंडितराव प्रवेश करितात.) तानाजी-महाराज, रोजच्याप्रमाणे भांडणच चाललेलें आहे, परंतु आपल्यास दर्शनास जाण्यास काही हरकत नाही. . शिवाजी-भांडण त्यांच्या आंगवळणींच पडलेले दिसते. चला आपण जाऊं दर्शनाला. (तुकारामाचे घरांत शिरतात. तुकाराम पोथी वाचीत असून त्याचे व जिजाईचे भांडण चालले आहे. महादेव मुतखड्याने आजारी आहे.) आजिजाई-जों जो तुम्ही त्या काळ्याच्या नादी लागाल तो तों तुमच्या संसाराचे तळपट होणार आहे. आज आठ दिवस झाले, पोरगें माझें मुतखड्याने आजारी आहे, तुह्मी त्याला काही औषधपाणी तरी करतां आहां का ? वैद्याकडे मुलाला न्यावें तर तुह्मी भिकारडे आहांत, हे वैद्याला ठाऊक असल्याने नुसतें मुलाला काय भावना होत आहे हे सुद्धां ते सांगत नाहीत. तुकाराम-आपल्याला वैद्याचे घरी जाण्याचेच कारण नाही. तूं जातेस कशाला ? पांडुरंगासारखा धन्वंतरी असल्यावर या नाका