पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. सात बाळ्या. ( कानावर हात ठेवते.) सरकाराजवळ मुळी खोटें बोलतांना जीभ अडखळते, आणखी खरें कायतें बाहेर पडतें. रंगू-हें मात्र अगदी खरें. आपणही बाई खोटें नाहीं बोलणार. - सई०-मग कशाला शेण खायला बोललीस ? की "हां आईसाहेब बाईसाहेब ह्मणतात तें खरें. जोडप्याने बाईसाहेबांच्या मनांत तुकोबांच्या पायां पडावें असें फार आहे." रंग-मग आपण खुणावलत ह्मणून मटले. आपल्या मनांत खरोखरच जोडीने पायां पडावयाचे असेल ह्मणूनच मघांशी मला खुणावलीत आणखी म्हणूनच मी म्हटले हो. सई०-तुम्ही चाकर कोणाच्यागे ? माझ्या की कोणाच्या ? रंग) -सरकारच्या पायाच्या. सई०-अस्सं काय ? बरें मी तुह्माला रजा देतें. येऊ नका माझ्याबरोबर देहूला. ( रागावून जाऊं लागते.) रा-बरें नाहीं बाईसाहेब, चुकलों. गंगू सई०-आतां थट्टा करायची हीच वेळ आहे नागे ? आतां चला लवकर तयारी करा. निघा येथून. (रंगू व गंगू जातात.) कधी आह्मांला बायकाला बरोबर न्यायचे नाही. सासूबाईबरोबर आलें असें पहातांच मोठे आश्चर्य वाटेल. पुण्याला परत येईपर्यंत एक शब्द सुद्धा बोलणे व्हायचे नाही. पण मग काय ताशेरा झाडणे होईल तें होवो. मी आपली सासूबाईंच्या आड लपेन. सांगेन की त्यांनी आग्रह केला, मी काही येत नव्हते, ह्मणजे मग गप्प. कांहीं बोलणे होणार नाही. सासूसासरे असले ह्मणजे आमच्यासारख्या सासुरवाशिणीला असें आड लपायला सांपडते. बाकी सासुरवास कसला असतो याचा मला मुळी अनुभव नाहींच मटले तरी चालेल. आई जगदंबे, मामंजीला आणि सासूबाईला पुष्कळ आयुष्य दे. म्हणजे आमच्यावर कस