पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० । श्रीतुकाराम. दर्शनाला येण्याचे आज किती दिवसांपासून आहे पण ? आतां अनायासाच योग आला आहे. आपल्याबरोबर मी आले झणजे मला कोणी रागें भरणार नाहीं कांहीं नाहीं. होय की नाहींगे रंगे? रंगू-हो आईसाहेब, बाईसाहेब ह्मणतात ते खरे आहे, जोडीने तुकोबाच्या पायां पडावें असें त्यांच्या मनांत आहे, ह्मणजे ते आशीर्वाद देतील. जिजाबाई-काय हट्टी मुली आहेत ? बरें चला, करा तयारी. गंगे तूं जाऊन येसाजी निकमाला माझा निरोप कळीव की, आह्मी तुकाराममहाराजांचे दर्शनाकरितां देहूस जात आहों. मेण्यांची आणखी घोडेस्वार कांहीं आडहत्यारी आमच्याबरोबर पाठविण्याची तयारी ठेवा. स्नानाकरितां आम्ही इंद्रायणीवर जाणार. तसेंच तुकोबाला पोषाख, त्यांच्या बायकोस चोळीलुगडे बरोबर असूंद्या. ते जरी स्वीकार करणार नाहीत तरी आपलें नेण्याचे काम आहे. तिथे सुवासिनीला वाटायला लुगडी चोळ्या लागतील त्या बरोबर घ्या. मी जातें आतां, दरबारची सर्व व्यवस्था लावतें. तुह्मी लवकर आटपा. (जाते.) गंगू-बाईसाहेब, आईसाहेब जर म्हणाल्या की मी नाही तुम्हाला बरोबर आणलं तर मग सरकार तुम्हाला रागें भरतील. सईबाई-हं हं ! तर तर ! सासूबाई बरोबर असल्यावर माझ्याकडे पाहील कोण ? मग बोलायची गोष्ट तर लांबच आहे तं नेहमी पहात आहेस म्हणून बरें आहे. रंग-तसें नाहीं बाईसाहेब, सरकार आईसाहेबांच्या लेखन जरी कांहीं नाहीं बोलले, तरी इथे आल्यावर तुझांला रागें भरतील कां आलांत ह्मणून ? मई-तुझी आहांत मग साक्षादार. सासूबाई चल ह्मणाल्या झणन आले. माझ्याकड काय आहे ? सासूबाईला विचारणे व्हावें. असें मी बोलेन. आपण नाहीं बाई खोटी साक्ष देणार. आपल्या कानी