पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. सईबाई-हो पण, मला कोणी संभाळावें ? अगोदर तिकडे जाणे झालेच आहे. आपण गेल्यावर मी पोरीने इथे काय करावे ? राज्यप्रकरणी कोणते वेळेस काय भानगड हाईल याचा कांहीं नियम नसतो. मी आपली काळजी करूं की, येथील व्यवस्था ठेवू ? माझ्या मनाला तरी स्वस्थता पाहिजेना ? सारखी मला तळमळ लागली आहे. (डोळ्यांस आंसवे आणून ) मी काही इथें घटकाभरसुद्धा पाणी प्यायला राहावयाची नाही. मी आपल्याबरोबर येतें. जिजाबाई-(तिला जवळ घेऊन ) वेडी नाही तर ! तुला रडायला काय झाले ? अगदी मुलगी कोवळ्या मनाची ! शिवाजी महिना महिना स्वारीला नाहीं का जात ? मग आतां तर तुकाराममहाराजांचे दर्शनास गेला आहे. तूं पक्कें समज की, साधूचे दर्शनापासून कल्याणच होईल. त्यांच्या प्रसादानेच आपल्यास हे दिवस आले. त्यांच्या प्रसादानेंच आपण राज्यवैभवाला चढूं, आणि त्यांच्या कृपेनंच दोन मुलेबाळे दृष्टीस पडतील. तूं चांगली धूर्त मुलगी आहेस, तुला अधिक काय सांगावें ? भाजभित रंगू-पाहिलेंस का गंगे ? नाही तर आपल्या सासवा ! अगोदर सून सून करितात, आणखी मग एकदां सून हाताखाली आली की लागल्या फुण फुण करायाला. HTTES गंग-खरेंच ग बाई, कांहीं पुसूं नकोस. त्यांतून माझ्या सामूसारखी सासू तर त्रिभुवनांत नसेल. पण इकडे पाहिले का, अगदी पोटच्या मुलीप्रमाणे जवळ घेऊन तोंडावरून हात फिरवीत आहेत तें ? बाईसाहेब नशीबाच्या खऱ्या ! फिजा जिजाबाई-रंगे, गंगे, मुलीला नीट संभाळा. तिच्या मनाला देवाधर्माच्या गोष्टी सांगून करमणूक करीत जा. बहुतकरून शिवाजीला घेऊन मी आज उद्यां परत येते. ( सर्व उभे रहातात.) सईबाई-जा गडे. मेलें हें काय पण, मला नाहींका तुकाराममहाराजांच्या दर्शनाची इच्छा ? माझ्या मनांत आपल्याबरोबर