पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. IF IT ए7 णून गेला तो दर्शन न घेतांच परत आला. मग मनाला तळमळ लागली. आतां फिरून उभाउभी तुकाराममहाराजांचे दर्शन घेऊन येतों ह्मणून गेला. मेलं देहू तें काय, फार झाले तर प्रहराचा रस्ता. तानाजी आणखी पंडितराव यांना काय समाचार आहे तो काढून आणा ह्मणून पाठविले, पण तेहि तिकडेच. काय करावें माणसाने ? घरची माणसें नेहमी विजापुरास. त्यांना काही काळजी आहे का ? वर्षांतून आठचार दिवस इकडे आले ह्मणजे झाले. का मोंगलांनी कांहीं कारस्थान करून विजापुरास धरून नेला, का काय, समजावें तरी काय ? सईबाई-अशी काय वेडीवाकडी कल्पना आपण मनांत आणावी? जगदंबेच्या कृपेनें कांहीं वांकडे होणार नाही. पण सासूबाई, आपल्या हे ध्यानात आलें का, की तानाजीराव आणखी पंडितराव यांनी जवाहीर आणि बोडा तुकारामाला न देतां परत आणल्यापासून हिकडे मनाला सारखी हुरहुर लागली होती ? कोणाजवळ बोलून दाखविणे झाले नाही. मग आपल्याजवळ कांहीं बोलणे झाले असल्यास नकळे. जिजाबाई-मला इतकेंच ह्मणाला की, आई, तुकाराममहाराजांनी घोडा, अबदागीर, जवाहीर यांचा कांहीं स्वीकार केला नाही. जो घोडा पूर्वी नुसते जीनसुद्धां चढवून देत नव्हता तो अमदीं गाईसारखा गरीब झाला आहे. याच्यावरून तुकाराममहाराज हे खरोखर विरक्त आहेत. साधु आहेत. त्यांचे दर्शनाला जाण्याचा माझ्या मनाला तळमळ लागली आहे. त्यांच्या या दर्शन घेऊन येतो. असें ह्मणून माझी आज्ञा घेऊन गेला. आज जर माझा बाळ परत आला नाही, तर मी काही अन्न घेणार नाही. मी जेवायला उशीर केला की, ती गिरजा आणखी तिची दोन मुलें कांहींच खात नाहीत. फार गरीब दोन्ही मुले. दुपारी मी देहूला स्वतःच जाईन म्हणते. तुह्मी घरीं सगळा बंदोबस्त ठेवा. संभाळा.