पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. ३७ मुलांना द्यावें असें आहे, ह्मणून ते गोप्याच्या हाती सांपडलें. तुमच्याकडे कोणाकडेस दोष नाही. गिरजाबाई, आणा तें जवाहीर झणजे मी आपल्या हाताने तुमच्या मुलांच्या अंगावर वालतों. ( गिरजा जाते. ) गोप्याचे आणखी गण्याचें नांव, तानाजीराव, आपल्या पागेत दाखल करा. त्यांना कायमची तनखा सुरु ठेवा. तुम्ही दोघे रोज मला येऊन भेटत जारे. (गिरजा गांठो. आणते. त्यांतील मोत्यांची पेंडी दोन्ही मुलांचे गळ्यांत घालतो.) गोप्या-) (शिवाजीचे पायावर डोके ठेऊन) आमच्या सरकारागण्या-ला शंभर वरस आवृक्ष हा. गिरजा-सरकार मी गंठुड घेऊन सरकारच्या पायापाशी येनार होते, पन आळंदीच्या गेनुवान सरकाराला हित धाडल. सरकारांनी माझ्या दोन मुलाच जल्माच कल्यान केल. सरकारच्या पायाची मी वहाण हाय. सरकाराला रामलक्षुमनापरमान दोन पराकरमी मुलग व्हत्याल. ( शिवाजी हंसतो.) तानाजी-सरकार, आईसाहेब आतां वाट पहात असतील, त्यांच्या दर्शनाला चलायाचेंना ? शिवाजी-चलारे मुलांनों आमच्या आईकडे. तुम्हांला पाहून आमच्या आईला फार आनंद होईल. (दोन्ही हातांत दोन मुलगे घेऊन जातो. पंडितराव व तानाजी एकमेकांचे हात धरून जातात व त्यांचे मागून गिरजा जाते.) प्रवेश २ रा. स्थळ-पुणे शहरांतील शिवाजीमहाराजांच्या वाड्यांतील दिवाणखाना. (जिजाबाई, सईबाई, गंगू, रंगू, चाकर वगैरे बसले आहेत.) जिजाबाई-आज तीन दिवस झाले, डोळ्याला डोळा नाही. शिवाजी माझें दर्शन घेतल्याखेरीज एक दिवस अन्न खायचा नाही. त्या दिवशी एकदां तुकारामबुवांचं दशन घेऊन येतों म