पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. ३५ भेटलास, वाइच चटणीभाकर खा. नग म्हनू नको. ( त्याच्या हातांत चटणीभाकर देते.) शिवाजी-या चटणींत कांदे घातलेत होय गिरजाबाई ? गिरजा-व्हय बाबा. तुला नग असली तर दुधासंग खा. शिवाजी-(एकीकडे ) मी या बाईला भाकरी खात नाहीं म्हटले तर तिला वाईट वाटेल. तिच्या मनाचा हिरमोड होईल. ( उघड) गिरजाबाई, मी आपले नुसतें दूधच पितों. (तानाजी व पंडितराव प्रवेश करतात.) गिरजा-बर बाबा. तानाजी-सरकारची स्वारी इकडे केव्हां आली ? आणखी ही बाई वेडी तर नाहींना ? भाकरी कसली देते सरकारच्या हातांत. (दरडावून ) ये बाई, अरे पोरांनों, बाजूला हटा इतके चिकटून कसले बसलांत. चला हटा. पंडितराव-महाराज, येथून तुकारामबुवाचें घर जवळ आहे. पाहिजे असल्यास दर्शनास चलावें. शिवाजी-तुमच्याबरोबर दिलेल्या जवाहिराचा तुकाराममहाराजांनी स्वीकार केला की नाही, किंवा ते तुम्ही परत आणलेत ? तानाजी-मी त्यांची थोरवी काय वर्णन करूं ? सरकार, अभिलाषबुद्धीने आपल्या मोत्यांकडे आणि रत्नांकडेस त्यांनी पाहिले सुद्धा नाही. घोड्याचे मस्तकावर हात ठेवतांच तो गाईसारखा गरीब झाला. आपल्याला पुष्कळ उपदेश केला आहे; पण सगळा मजकूर सांगण्याच्या पूर्वी आमची महाराजांजवळ एक विनंति आहे की, आमचे उभयतांचे हातून एक भयंकर चूक झाली आहे. शिवाजी-काय झाले? तानाजी-पंडितराव आणखी मी उभयतांनी विचार केला की, इंद्रायणीचें स्नान करून जाऊं. दोघांनी स्नानें केली. धांदलीत जवाहिराचें गांठो. नदीवर विसरलो. बरेंच लांब आल्यावर स्मरण झाले. नंतर जाऊन पहातों तो तेथे काही नाही. आमच्या हातून