पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ श्रीतुकाराम. गिरजा-(चापट्या मारते.) घे पेंडक. हो शिवाजी. हो राजा. घे मोत्याच पेंडक. (गण्या रडतो.) शिवाजी-गोप्या हा काय मागतोरे ? तुझा भाऊ आपल्या आईला काय मागतोयरे ? पेंडकें कसले ? गोप्या-काय इचभन लई पुदाक. गाईला पानि पाजायाला नदीवर गेलतो. तिथ एक गंठुड घावल. सोडूनशेनि पघितल तो आतमधी मोत्याच असलल पेंडक ( हाताने दाखवितो. ) आन काचच खड कस चमचम करत्याति-इतक मोति हायति-पघा राव. आईजवळ मुकाट्यानी नेऊनशेनी दिल. हा गन्या जवळ व्हता. आई म्हंगाली मोत्याची पेंडकी हायती. पाटलाला समजल तर कोलदांडा घालून मार देईल कुनाची तरी चोरून आणल्याती म्हनशानी म्हनल. मंग समद गंठुड जमिनीत पुरुनशानी ठेवलया. तेव्हां गन्या रडतोया. पेंडक घालाया मागतोया. आता काय कराव. शिवाजी-गण्या तुला पेंडक घालून काय करायचे रे ? गण्या-मंग शिवाजी बर घालतो ? घालतों म्हून माझी आई सांगती. नाही तर दाव शिवाजी कसला हाय तो गिरजा-तो राजा हय्. तूं मेल्या नांगऱ्या, तुला कशापायीं पेंडक हावरे ? आतां बयबोलान भाकर खातोयास का देऊं आणखीन रट्टा-दादा, मी रांडमुंड है-नवरा गमावला-खायाला नाई-आन हे एक कड्याळ आलया गळ्यामंदी. कनी त्यांना मोतीबि जिरून देनार नाइ. गोप्या-गाईच्या माग धांवता धावता पलडों गुडघे बि फुटल पन हा दादा लई नामी मनुक्ष हय. यान गईला संभार मी रडाया लागलों तर मला समजावल. त्या बामनाची गई लर्ड खव्याळ. हा दादा म्हनतुया का तुला शिवाजीच्या देतो म्हनशानी ( हळूच.) त्याला वाइच भाकर खायाला दे वार्डच दूधबि दे. गिरजा-बरं दादा, तू आपला या मुलाला एक धर्माचा बापच