पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३ अंक २ रा. शिवाजी-पण कायरे शिवाजीची आन् तुझी एकदम गांठ पडली आणखी शिवाजी खुष झाला तर तूं काय मागशिलरे? शेत मागशील, का गांव मागशील, का घोडा मागशील ? गोप्या-आईच्या पोटाला भाकर आन वस्तार. काय सांगू दादा, माझा बाप मेल्यापुन माझ्या आईला निया दान्याची भाकर एक दिसबि मिळाली नाय. दान्यामंदी कोंडा घालुनशान माझी आई भाकर खाती. धाकल्या भावाला भाकर मागन, आन् म्यापल्याला घोड्यावर बसून लढाईला जान्याची चाकरी. शिवाजी-(एकीकडे ) आईचेविषयी इतकें प्रेम ! किती मुलगा गुणवान आहे ! परमेश्वर याला काही कमी करणार नाही. ( उघड ) पण कायरे तूं लढाई मारशील का ? .गोप्या-शिवाजी महाराजाला खुस करन्याकरता या जिवाचं कांहीं बिका व्हइना. लढाईवर जाईन आन दुस्मानाला या मर्दाचा हात दाखवीन. बाकी आम्ही काय कुनबी गडी. (लांब पाहिलंसें करून ) दादा पन ती पहा माझी आई गन्याला घेऊन हिकडच येत हाय. आमच्या संग तूबि वाइच भाकर खाशिल का ? भाकर आपली कोंड्याभोंड्याची असल. गईच दूध भाकरीसंग खायाला दील माझी आई. (गिरजा व गण्या प्रवेश करतात.) गिरजा-बसला मेला शिळोप्याच्या गोष्टी बोलत. हा एक दादा कुनी मिळाला हाय गप्पा फाकाया. गई तिकड लोकाच्या वावरांत शिरून लोकांनी तिला लंगडी करूं दे, म्हनजे मग तो बामन हैय् आन् तूं हयस. गण्या-आई दे मला मोत्याच पेंडक. म्हणजे मी गळ्यामंदी घालनशानी शिवाजी राज्यागत बाजारांत जाईन. दे मला पडक मोत्याच. गिरजा-मेल्या कशाचर पेंडक आलया ? गण्या-ते मघाशी दादान आनल ते देतिस का नहि ? (लोळण घेतो.)