पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. तून भळा, भळा, भळा रघत आलया. (शिवाजी त्याला उठवितो.) शिवाजी-अरेरे, गरीबाचे पोर पडले बिचारें! बाळ रडूं नको अँ, तुला खायला देईन. गोप्या-नग मला. पन दादा तुझ्या पाया पडतो तेवढी गवळी गई वळनश्यानि आनः तो बामन लई वंगळ हय. सांची गई घरी गेली नई तर कुत्र्यावानी मला बडवील. (रडू लागतो.) शिवाजी-रडूं नको बाळा. ( त्याला पोटाशी धरून त्याचे डोळे पुसतो.) तुझ्या गाईला मी बांधून इकडे आणतों, मग तर कांहीं हरकत नाहींना ? (त्याची गाय वळवून आणण्याकरितां जातो.) गोप्या-पाहार दिस आलाया. दोपार झालिया. अझून भाकर आनतीया. गन्या बरं लवकर न्येही करतो आन् गोप्याला पाहार दिस आला म्हून काय झाल. कसा न्याव है ? राती बि भाकर नहि. बाबा गेल्यापुन लई हाल चालल्याति. ( शिवाजी प्रवेश करतो.) लोक घोड्यावर बसूनशान शिवाजीबरोबर जात्याति. आन आमी म्हशीवर बसतो. थू आमची जिनगानी. आम्हाला घोड्यावर बसतां येत नाय की काय ? पन घोडा देतय कोन ? नग हा गुराख्याचा रोजगार. पण पोट जाळाव लागतना ? शिवाजी-गुराख्याचा रोजगार नको, तर शिवाजीच्या पागेंत रोजगार धरीनास ? चल मी येतो तुझ्याबरोबर. तुला कोण कोण आहे रे ? तुझें नांव काय ? ... गोप्या-माझ नांव गोप्या. माझ बाबा गेल्याला सहा महिनं झाल. तव्हापुन आमच लई हाल चालल्याति. यंदा पारस शेतामंदी काइ पिकल नहि. मला आई हाय, एक धाकला भाऊ गन्या म्हन हाय. दोन बैल घरीं हायेत. आन् गईबि हाय. तीबि कालपून लई वंग वंग करतिया. चाराबि खात नहि, पानिबि पीत नहि. काय कराव? काय पुसतोस दादा ? शिवाजीराजा लई मायाळ हाय असं म्हनत्याती, पन आपल्याला कोन इचारतया ? आम्ही गुराखी, आन् शिवाजी राजा ! गांठ पडनार कशी?