पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक दुसरा. - - प्रवेश १ ला स्थळ-जंगल. ( शिवाजी प्रवेश करतो.) शिवाजी-धन्य धन्य तुकाराम महाराज ! या दुर्दैवी शिवाजीच्या हातून तुकारामाची सेवा काय होणार आहे ? काय त्यांचे सत्व ! केवढा मनाचा थोरपणा ! उपदेश किती गंभीर ! विचार किती पोक्त ! पांडुरंगावर केवढा विश्वास ! संसाराविषयी किती तरी उदासीनता ! संपत्तीचा तिटकारा ! संसारांत असून अलिप्त ! असा साधु कोणीच झाला नसेल व पुढेही होणार नाही. परमेश्वरा, अशाची संगती आह्मां मूढ जनांला रात्रंदिवस दे, यांतच मला गोडी वाटते. राज्य प्राप्त झाल्याचे सुख या संतसंगतीचे सुखापुढे तृणवत आहे. आतां घरी जावेसे वाटत नाही. आईसाठी घरी जावयाचे. घरी जाऊन तरी काय करावयाचे आहे. नित्य राज्याच्या उलाढाली, किल्ल्याला शह, आणखी लूट मिळाल्याचा हिशेब. असें करतां करतां एक दिवस राम मटले झणजे झालें. पुढची तयारी कांहींच नाही, असो. (लांब पाहिलेंसें करून हांसतो.) हे गुराख्याचे पोर या गाईच्या मागे धांवतां धांवतां अगदी थकून गेलें आहे बिचारें ! ( गोप्या प्रवेश करतो.) गोप्या-( इकडून तिकडे पळत पळत ) गवळीव, व, गवळी व, व, हो, हो, हो ! कालपुन भाकर नहि.आईला आतां भाकरीच इचारल तिनं एक रपका दिला पाठीमंदी, आन् सांगितल की, रानामंदी भाकर घेऊन शेनी येते म्हनुनशान. गवळी व, व. ( धांवतो व आडखळून पडतो.) अगबया, बया, बया ! मोडला पाय ! ( रडूं लागतो. ) अग आई, आई, आई ! पोटामंदी आन नाहि, गुडग्या