पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० श्रीतुकाराम. होतो. दहा शेर साखर आठ दिवस कशी तरी पुरते. तुला नेहमी पोटदुखीची व्यथा असल्याने दूधभात, साखर, तूप यांची पथ्य. मुलें सुद्धा जवळ सहन होत नाहीत. इतकें खाल्लं तरी तुला भुकेनें लहरी येतात. शरीरांतली सगळी हाडे नाहीशी झाली. तुझें दुःख कोणी जाणत नाही.असल्या बायका नवन्याला सुद्धा खाऊन टाकायाच्या. जीवंतपणीच त्याला गाढव करायच्या आणखी मेल्यावर नरकाला न्यायच्या. पण मी काही तुझ्या सपाट्यांत सांपडलों नाही. मन जिजाई-(तुकारामाचा हात धरून त्यास फरफर ओढते.) चला धांत, पावशेर तरी दाणे आहेत का दाखवा मला. तुपसाखरेचें नांव कशाला घेतां ! चला घरांत. तुकाराम-नाही. नाही. हा विनोद झाला. महादेव) आई सोड आमच्या बाबाला. काय म्हणून त्याला काशी फरफर ओढतेस (सर्व घरांत जातात.) [अंक पहिला समाप्त.]