पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२. अंक १ ला. पायांवर तानाजी व पंडितराव मस्तक ठेवतात ) महाराज येतों आतां आम्ही. तुकाराम-जेवून जा आमचे घरी. काय कण्याभाकरी असतील त्या गोड करून घ्या. पंडितरावाकरितां ब्राम्हणाच्या घरी शिदा देऊन स्वयंपाक करवितों. तानाजी-नको महाराज आतां.सरकारांनी आझांला जेवायला परत बोलाविलें आहे. तुकाराम-ठीक आहे. तुम्ही सर्व शिवाजी राजाचे प्रत्यक्ष अवयवच आहांत. तेव्हां तुम्हांला अधिक काय सांगावयाचे आहे ? तुम्ही आपल्या प्रभूचे ठिकाणी एक भाव ठेवून स्वामिभक्ति दृढ केलीत, तर पांडुरंग तुमची कीर्ति या महाराष्ट्रांतच काय, परंतु सर्व पृथ्वीत अजरामर करील इतकेच आमचे सांगणे आहे. ( तानाजी व पंडितराव जवाहीर घेऊन जातात. जिजाई व मुलें प्रवेश करितात.) चला आतां आपल्या घरांत. स्वयंपाकघरांत जाऊं चला. जिजाई-स्वयंपाकघरांत जाऊन चूल बघायाची आहे काय ? चांगली घर चालत आलेली लक्ष्मी लाथ मारून हाकून लावलीत, तुम्हांला कांही लाज वाटते का ? महादेव-ताई तूं मडकी मात्र व्यर्थ फोडलीस. काशी-मी फोडलीं कारे महाया ? अगोदर कोणी फोडली ? जिजाई-दोघांनी मेल्यांनों फोडली. कसली चांगली मडकीं पण त्यांचा कचाल केला. (मुलांना मारते.) आणा आतां मडकी. आणा मडकी. तुकाराम-आणूं बरें आतां. वेळ आली म्हणजे घेऊन येऊ. जिजाई-त्याचीच तर वाट पाहात आहां, पण तें येईनाना. मी मेलें एकदांची म्हणजे मोकळे झालांत. तुकाराम-नाही पण आतांशा बरीच वाळलेली दिसतेस. आहारही पण आतां अगदी तुटतच चाललेला आहे. अन्नद्वेष झाला आहे. पायलीभर गव्हांत फार झाले तर तीन वेळां सांजा