पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ श्रीतुकाराम. प्रतिनिधि, पेशवे, सुरनीस, चिटणीस, राजाज्ञा, सुमंत, सेनापति, सर्वांना आमचे नमस्कार सांगून विनांत करा की, आमचे भाषणाचा मतलब विवेकानें प्रभूला समजावून सांगा. सात्विक, प्रेमळ असे दृष्टांत देऊन प्रभूचें मन पांडुरंगाच्या भक्तिमार्गाकडे वळवा. आमचे भाषणाचा अर्थ वायां जाऊ देऊ नका. भिडेकरिता शब्द गाळले तर तुझांस अनर्थकारक होतील. कारण शिवाजी राजे श्रीशंकराचे अंशभूत आहेत. ते सर्वत्र आहेत. येथे सुद्धा आहेत. तुम्ही आम्ही काय बोलतों हे ते ऐकतच आहेत असे समजा. शिवाजी-(एकीकडे ) आतां बरीक ठीक नाही. आतां येथे येऊन माझा हात न धरोत, म्हणजे मिळवली. आतां येथे राहण्याची सोय नाही. पळा येथून आता. (जातो.) तानाजी-स्वामीच्या आज्ञेप्रमाणे प्रभूस निरोप सांगतो. पंडितराव-स्वामीस बसण्याकरितां प्रभूनी घोडा पाठवून दिला आहे तो आमी येथे ठेवून जातो. तुकाराम-त्या घोड्यावर तुम्ही बसून जावें. तानाजी-महाराज, तो बेफाम आहे. स्वारी होऊन देत नाहीं तुकाराम-आणा आमच्यासमोर. (घोड्याचे अंगावर जातो.) तानाजी-हं हं महाराज, तो चावेल, फार दुष्ट आहे. टापा झाडलि. तुकाराम-तुझा धर्म तुला पाळला पाहिजे. (घोड्याच्या मानेवर थोपटतो.) नानाजी-दिवाणजी, तुमचा घोडा अगदी गरीब झाला. तुकासाममहाराजांनी गळ्याला मिठी मारतांच त्याच्या नेत्रावाटे प्रेमाश्रु गळावयास लागले. तो आपले तेज विसरून गेला. त्याचा मीपणा नष्ट झाला. त्याचे खेकाळणे आणि दुलाच्या झाडणे बंद पडले. काय चमत्कार आहे ! आमच्या महाराजांनां हे फारच भाभर्य वाटेल. कारण आजपावेतों प्रत्यक्ष महाराजांनासुद्धा त्याने बसू दिले नाही तो इतराची काय कथा ? ( तुकारामाचे