पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. २७ रोडावून गेलेले, असे आम्ही आहों. तेव्हां त्यांना आमची विनंति * कळवा की, भेटीचें नांव कांहीं काढू नका. -शिवाजी-(एकीकडे ) सुंदर कांता आणि सुवर्णाची रास ही पाहून ज्याचें मन चळत नाही, तोच खरा विरक्त. तुकाराममहाराजांची मी व्यर्थ कसोटी पाहिली. हे द्रव्य ते घेणार नाहीत. तुकाराम-बरें, तुमच्या स्वामीजवळ येऊन आम्ही मागावें तरी काय? आमच्या आशेचें शुन्य झालेले आहे. त्यांत पांडुरंग आमचा पालन करणारा आहे. त्याने आम्हांस कृपाळू होऊन निराशेचा गांव जहागीर दिला आहे. त्यांना आमचा असा उपदेश सांगा की, तुमचे संगतीला जे दुर्जन आणि निंदक असतील, त्यांच्या युक्ति मनावर घेऊ नका. विवेक करून, राज्याचे खरे रक्षक तुमच्यासारखे कोणी असतील, त्यांचा प्रतिपाळ करावा. तूं सर्वज्ञच आहेस. अनाथाला साह्य करावें, धर्माचे रक्षण करावें. एवढें तूं केलेंस म्हणजे आम्हांस समाधान आहे. मग आमची भेट घेण्याचे कारण नाही. तुझी ख्याती त्रैलोक्यांत होईल. श्रीरामदासचरणीं मन अर्पण केलेंस ह्मणजे सर्वाभूतीं एकच आत्मा आहे हे तुला समजेल. मग वृत्ति चढू देऊ नको. ह्मणजे तुझे हातून रामदास्य घडेल आणि तुला आमी चातुर्याचा सागर असें म्हणूं. शिवाजी-(एकीकडे ) स्वामीचा एकेक शब्द माझ्या मनाला बाणासारखा लागतो आहे. मी व्यर्थ कपट केलें आणि दुष्ट बुद्धीने माजलेला ठाणबंदी घोडा स्वामीस बसण्याकरितां पाठविला. तुकाराम-अन्न मागावें तर भिक्षा कांहीं कमी श्रेष्ठ नाही. वस्त्र मागावें तर रस्त्याने चिंध्या पुष्कल सांपडतात. पाषाणासारखा मऊ बिछाना आणि आकाशाचे प्रावरण. मग आतां आम्हांला कशाची जरूर आहे ? आमाला येऊन काय करावयाचे आहे ? हे द्रव्य घेऊन जा. ते पाहून आम्हांस किळस येते. त्याला आम्ही स्पर्श सुद्धा करणार नाही. त्याच्याकडे आम्ही पाहणार सुद्धा नाही.