पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. आहे. (तानाजी व पंडितराव तुकारामाचे पायां पडतात.) लागलीच गवाने फुगून जाऊन ठमाबाई चिमाबाईला डागिन्यांची ऐट दाख- . विण्याकारितां धांव मारलीस. तुला लाज नाही वाटत. जिजाई-मोठे मेले सुवर्णाचे मेरु ! घरांत चिमणी कोकलली तर मठभर दाणे नाहीत. ह्मणे आम्ही समुद्राप्रमाणे तृप्त आहोत. डागिने कांहीं तुह्मांला अंगावर घालावयाचें नाहींत, कांहीं नाहीं. तमी अडकवा ते माळेचे हायकोल. मी आणखी ही माझी सोन्यासारखी मुले आम्ही घालूं ते जवाहीर अंगावर.. तकाराम-मग तुझ्या अंगावर रस्त्यावरची कुत्रीं भुंकतील आणखी । मुले तुला खडे मारतील त्याची काय वाट ? जिजाई-ते डागिने परत केलेले मला माझ्या या नजरेने पाहवत नाहीत. कारट्यांनों चलारे येथून चालते व्हा. ( दोन्ही मुलांना मारीत मारीत घेऊन जाते.) तानाजी-महाराज, आमचे अन्नदाते स्वामी शिवाजीमहाराज यांनी आपल्या चरणापाशीं अशी विनति करावयास सांगितली आहे की, स्वामींनी कृपा करून एक वेळ या दासाला चरणाने की यावे. हे जवाहार स्वामींचे चरणी अर्पण करावयास हिर शिवाय लवाजमा बरोबर दिला आहे, हे विनंतीपत्र दिले आहे. (पत्र तुकारामाचे हाती देतो.) तुकाराम-(पत्र वाचून हंसतो.) ब्रह्मदेवाने ही सृष्टि निर्माण केली, त्यांत नाना प्रकार आणि नानाप्रकारच्या युक्ति केल्या आहेत. परंतु त्यांत शिवाजी राजे म्हणजे युक्तीचे केवळ आगरच भरत शिव हे नांव फार पवित्र आहे, मोठा ब्रह्मनिष्ठ असून व्यायी आहे. गुरुभक्ति करावी अशी मनांत फार इच्छा आहे. नामही आहे. व्रत, नेम, तप, ध्यानयोग ही सर्व जाणत आहे. आतां आमच्या दर्शनाचा मोठासा सोहळा तो काय होणार ? आदी अरण्यवासी, उदासीन, अमंगळ, दर्शन घेण्यास अयोग्य, वस्त्रहीन, शरीर मलिन, अन्नरहित असल्याने हे हातपाय असे