पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. २५ डितरावालासुद्धा ठाऊक नाही. बाकी तुकोबाचे घरांत लपायला जागा विपुल ! सर्व घरच चंद्रमौळी आहे ! जिजाई-पण काय हो दिवाणसाहेब, आमच्या शेजारी ठमाबाई रहाते तिला हे जवाहीर दाखवून आणूं का ? कारण आमाला ती फार भिकारी भिकारी म्हणत असते. पंडितराव-बाई, तुह्माला वेडबिड तर लागले नाहींना? एकदा आम्ही तुकाराममहाराजाचे स्वाधीन हें जवाहीर केलें, म्हणजे मग तुह्मीं ठमाबाईला दाखवा की चिमाबाईला दाखवा. तुकाराम-(एकीकडे ) पांडुरंगा, आतां मला याच्यांत कशाला गोवतोस ? अबदागीर, छत्री, घोडे, आणखी हा लवाजमा घेऊन माझ्या मनाला तिळमात्र तरी सुख वाटणार आहे काय ? हे सर्व सुखाचे प्रकार माझ्यांत आणि तुझ्यांत अंतर आणतील. माझी तुझी ताडातोड करतील. मायलेकरांची ताडातोड केल्यावर तें बालक कसे वांचेल? मानमरातब आणखी धनदौलत ही मला श्वानाचे विष्ठेप्रमाणे आहेत. पण आमची कारभारीण पहा. स्मशानांत कावळे जसे पिंडांवर झडप घालतात, तशी तिच्या मनांत त्या ताटावर झडप घालावयाची आहे. (जिजाई जवाहिराचे ताटावर झडप घालून पळविते, तुकाराम हाताला हिसडा देऊन ताट हिसकावून घेतो व उघड बोलतो. ) हं हात आटप. हा तुकाराम जीवंत असतां त्याच्या घरांत या संपत्तीरूपी अकाबाईचा फेरा ! जिच्या नुसत्या आगमनाने घरांतल्या मडक्यागाडग्यांचा चुराडा उडाला. प्रत्येकाच्या मनांत लोभरूपी मांगानें आपला पगडा बसविला. घरांतली शांतता नष्ट झाली. आणखी या घराची पुण्यभूमि भ्रष्ट होऊन जिकडे तिकडे दाणादाण झाली. आणारे ते खाऊचे रुपये. ( रुपये हिसकावून घेतो. तानाजीकडेस वळून ) शिवाजीमहाराजांनी आम्हांला काय अर्पण करावें ! आह्मी निरिच्छ, आमचे घरीं कांहीं कमी नाही. शिवाजीचे देणे म्हणजे समुद्रावर पाऊस पाडणे, सुवर्णमेरूला एक ताटभर पितळेचे अलंकार अर्पण करण्याप्रमाणे