पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ श्रीतुकाराम. घालून, भरजरी पैठणी नेसून, एकदां सगळ्या गांवांत सोयन्याधायऱ्यांच्या घरी जाऊन आल्याखेरीज मला कांहीं चैन पडावयाचें नाही. आज सारे रात्र मला कांहीं झोंप यावयाची नाहीं. ( सर्व हंसतात.) काशी-पण राजा शिवाजी ह्मणतात आपल्या आईचेच स्वाधीन आहे. तेव्हां तिनेच आज्ञा केली असेल ह्मणून ही दौलत आ - पले घरीं आली आहे. महादेव-पांडुरंगा, शिवाजी राजाला; त्याच्या राणीला आणखी त्याच्या आईबापाला पुष्कळ आयुष्य दे. ह्मणजे ते आम्हांसारया गरीबांचा असाच समाचार घेतील. काशी-देवा, त्यांनां आमच्यासारखीच मुलें होवोत, म्हणजे ती राजाशेजारी सिंहासनावर बसतील. जिजाई-कशाला छळायला वाटते. तुम्ही छळतां कीं नाहीं मला? तानाजी-मुलांनों, तुमचे तोंडांत साखर पडो. हे घ्या रुपये तुम्हांला खाऊकरितां. (उभयतांस रुपये देतो. ) पोरगा पण अगदी बापासारखाच होणार बरेंका दिवाणसाहेब ! शिवाजी-(एकीकडे ) शाबास मुलांनों ! तुम्ही मला आयुष्य इच्छिलेंत यांत कांहीं नवल नाही. पण माझ्या आईबापाचें नांव तुमच्या तोंडांतून निघाले, हे पाहून मला तुमची धन्यता वाटते. या मुलांनां द्रव्य पाहून काय पण आनंद झाला आहे ? खरोखर परमेश्वरा, पैसा ही किती दुःखाची गोष्ट आहे ! याच्यापासून जीवाला काय काय अपाय होतात, याची या मुलांनां कल्पना सुदां नाही. बिचारे दरिद्रानें गांजलेले आहेत. दुष्काळामुळे पोटभर अन्नसुद्धा मिळत नसेल. या बाईला तर असे झाले आहे की, हैं जवाहीर एकदा आपल्या घरांत केव्हां जाईल. मला तर वाटते, की तिच्या मनांत त्या ताटावर एकदां झडप बालून ते घरांत घेऊन जावें. द्रव्याचा लोभ फार कठीण आहे. कदाचित् माझ्याकडेसच धांवत येईल. मी येथे लपून बसलो आहे हे तानाजीला व पं चाय पप- 5