पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला.. २३ यांचे खाजगत स्वाधीन करण्याविषयी आमचे सरकारची आम्हांस सक्त ताकीद आहे. जिजाई-आम्ही कोठे म्हणतों की, आमच्या स्वाधीन करा. आम्ही आपले चोरच आहोत. त्यांच्याच स्वाधीन करा. पण तो पोषाख कोणाकोणाकरितां आणिला आहे,, कसला पोषाख आहे, काय काय आहे, हे तर आह्मांला पाहण्यास काही हरकत नाही ? का शिवाजीमहाराजांनी असे सांगितले आहे की, त्यांच्या प्रत्यक्ष बायकामुलांनां नुसते दाखवू सुद्धा नका ! तानाजी-दिवाणजी, बघून द्या त्यांनां. बाई तुह्मांला दाखवू नये तर कोणाला हें जवाहीर दाखवावे ? हे तुमचेच आहे. हे पोषाख तुमचेच आहेत. फक्त तुकाराममहाराजांचे हातून तुह्मांस मिळावयाचे आहेत. जिजाई-काशे, ये महाद्या; घ्या मेल्यांनों आतां हवे तितके डागिनेच डागिने! पैसेच पैसे ! आज माझ्या माहेरचा बहिरोबा आणि मंगळाई देवी ही एकदमच पावली. आतां मात्र दहीभात नारळ दोनी देवाला दिलाच पाहिजे. ( तुकाराम हंसतो.) महादेव-आणि आतां ही आपल्या घरांतील, चांदीची भांडी, ही सोन्याची भांडी, पार नाहींशी करतो. चांदीची भांडी ! सोन्याची भांडी ! ( लाथा मारमारून मडकी फोडतो.) काशी-दादा मीही पण तुला मदत करितें. ( मडकी फोडूं लागते. दोघे आनंदाने उड्या मारतात.) जिजाई-(अत्यंत हर्षभरित होऊन इकडे तिकडे फिरते.) काय त्या बहिरोबाचे आणि मंगळाईचे औदार्य ! धन्य आहेत माझ्या माहेरचे देव ! महादेव-धन्य आहे राजा शिवाजी ! धन्य आहे पांडुरंग ! कोठली आणली मुंगळाई आणि बहिरोबा ! ! कसें ग ताई आपल्या आईला तर अगदी वायु होण्याचा बेत आला आहे नाहींगे ? जिजाई-नथ, बुगड्या, मोत्यांचे पेंडे, हातांत गोठ, पाटल्या