पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ श्रीतुकाराम. चा बाप गेलानों पळून. आतां खाल काय माझी हाडें. तो आतां दुपारा आयता आदळायला मात्र उगवेल. काशी-पण आई, तूं कसें बाबाला जाऊ दिलेंस ? आतां आम्हाला रागें भरतेस. परवां बाबा रुसून गेले, तेव्हां भामनाथ डोंगरावरून तूंच त्यांना समजावून घरी घेऊन आलीस, तशीच आणजा त्यांना आतां. महादेव-नुसते बाबाला घेऊन कांहीं खावयास मिळते वाटतें? ते काही तरी दाणेविणे आणायलाच गेले असतील. काशीलान् आईला तेवढें बाबांनी खायला आणलें, पैसे आणले म्हणजे बाबा गोड, नाहीतर कुत्र्यासारख्या त्यांना चावावयाला धांवतात. जिजाई-का फार जीभ चुरचुर करते ? पाहिजे वाटतं चौदावं रत्न ? महादेव-सकाळच्या प्रहरी होऊन दे की बोहनी एकदां आतां. कांहीं बाबा जवळ नाहीत काही नाही. हे आमचे रोजचेच फराळाचे आहे. ( तुकाराम हांसतो, तानाजी व पंडितराव प्रवेश करितात. शिवाजी चोरून प्रवेश करतो आणि लपून बसतो.) कोण हो तुम्ही ? तुम्ही आमचे बाबाचे दर्शनाला आलांत काय ? तानाजी-बाळ, तुझा बाबा कोठे गेलारे? आम्ही त्यांच्या दर्शनाकरितां आलो आहोत. आम्हांस शिवाजीमहाराजांनी त्यांनां घेऊन येण्याकरितां पाठविले आहे. त्यांचे स्वारीकरितां घोडा. अबदागीर, मशालजी, मोठा लवाजमा आमच्याबरोबर दिलेला आहे. शिवाजीमहाराजांची आम्हांस अशी आज्ञा आहे की, तुकाराममहाराजांस घोड्यावर बसवून वर अबदागीर धरून वाजत गाजत त्यांची स्वारी पुण्यास आणावी. आमचे सरकारास त्यांचे दर्शन घ्यावयाचे आहे. पंडितराव-श्री तुकाराममहाराजांचे चरणापाशीं विनति करून महाराजांस आमच्या सरकारांनी ही पत्रिका दिली आहे. ही मोहोरबंद थेली व जवाहिराने भरलेले हे ताट, तुकाराममहाराज