पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. स्थिति झाली, तर मनापासून शरीर कांहीं वेगळे नाही. मनाने आपल्याबरोबर शरीरालाही ओढिले. शरीराने सर्व इंद्रियें ओढलीं, आणखी इंद्रिये आपला विषय विसरून गेली. हिलाच सहजस्थिति ह्मणतात. तूं आपल्या मनाला जिंक. इंद्रियाचे दमन कर. म्हणजे हाच मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे कांहीं देवाजवळ शेलापागोट्याचें गांठोडे नाही आणि तें तुला देव देणार आहे ? अज्ञानाचा नाश झाला म्हणजे मोक्षच मिळाला. कोणत्याही जातीचा मनुष्य असो, स्त्री असो, किंवा पुरुष असो, जपी, तपी, संन्यासी, विषयी, सर्वत्रांस हा तुकाराम छातीला हात लावून असे सांगतो की, तुह्मीं पांडुरंगाचे नाम घेतले तर प्रत्यक्ष पांडुरंगच व्हाल. तुम्हांस घर सोडावयास नको, दार सोडावयास नको, रानांत जावयास नको, कुळधर्म कुळाचार सोडावयास नको, कोणत्याही प्रकारे श्रम करण्याचे कारण नाही. एक पांडुरंगाचें नाम सर्व प्रकारची कामें करिते. आम्ही हा नामाचा शिक्का वैकुंठाहून घेऊन याच कामाकरितां आलो आहो. जो आमचा शिक्का मानणार नाही त्याचे यमाजी भास्कराचे हातून नाक कान कापले जातील. रावणाने रामनामाचा शिक्का मानला नाही, त्यामुळे त्याचे राज्य जाऊन त्याच्या कुळाचा नाश झाला. शंकरानें रामनामाला मान दिला, त्यायोगाने त्याने हलाहल प्राशन केले तरी तो सर्वांगीं शीतल झाला. उघडच आहे, मन रामी रंगलें । अव मनची राम झालें । (मुलांकडे पाहून) या मुलांनां बरी गाढ झोप लागली आहे. आतां आपण इंद्रायणीला स्नानाकरितां निघून जावें, नाहीतर ही का एकदां जागी झाली म्हणजे खाण्याकरितां माझे लोळे तोडतील. ज्या परमेश्वराने त्यांना उत्पन्न केले त्याने खाण्याचीही तजवीज केलीच आहे. (जाऊं लागतो; इतक्यांत शिवाजीचे लोक आल्याची चाहूल लागते, ते पाहून एका कोपऱ्यांत आड उभा रहातो.) जिजाई-(आळस देत देत ) महादेव, महादेव, महाया, ये मेल्या महाद्या. काशी, काशे, ये रांडे काशे. मेल्यांनों उठा, तुम