पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० श्रीतुकाराम. सई०-मटले मी येऊका बरोबर दर्शनाला! शिवाजी-इतक्यांत नाही.माझ्या मनाला अगोदर तुकारामबोवा मानवले पाहिजेत. थोड्यांत परीक्षा आहे. जवाहिराने भरलेलें ताट पाठवितो. जर घेतले तर मंबाजीप्रमाणेच त्या साधूंत कांहींच अर्थ नाही. माझ्या मनाचे ठिकाणी जर पूज्यभाव उत्पन्न झाला तर लागलीच आईला आणि तुला घेऊन जाईन. आतांच अडीच तीन प्रहर रात्र होऊन गेली आहे. आह्मी आतां निघालों तर उजाडावयाला देहू गांठं. तानाजी आणि पंडितराव यांनां पुढें पाठवितो. आणि त्यांनां नकळत मागाहून मी जातो. बबूं काय मौज होते ती. आतांच जातो. जेवायला परत येतो. (जाऊ लागतो.) सई०-( हात धरून) पण सकाळी का नाही जायचे होत ? सासूबाईला विचारले पाहिजेना ? शिवाजी-साधुसंत, देव, यांच्या दर्शनाला केव्हाही जाण्याची मला तिची नेहमीच परवानगी आहे. उलट न गेलो तर रागावते. तथापि मी आईला आतां विचारूनच जातो. ( जातो. सईबाई हिरमुसलेली उभी राहते.) प्रवेश ४ था. स्थळ-तुकारामाचें घर. (तुकाराम बसलेला आहे, त्याची बायको व मुलें निजलेली आहेत.) तुकाराम-प्रातःकाळची वेळा किती तरी पवित्र असते! हा रामाचा प्रहर, यावेळी बहुतकरून मन शुद्ध असते. यावेळी मनाला गोविंद नामाचा छंद लागला, तर ज्या तोंडानें गोविंद नामाचा उच्चार होतो तें तोंड देहाचा एक भागच असल्याने तो देहच गोविंदरूपी बनून जाईल. असे झाले असतां या आपल्या देहांत आणि परमेश्वरांत काय भेद राहिला ? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनीं । जागृती स्वप्नी पांडुरंग ॥ अशी जर आपल्या मनाची