पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. अशा साधूच्या दर्शनालासुद्धा मला जाण्याचा तिटकारा आहे. परवां ज्ञानोबाचे आळंदीस मंबाजीबोवा म्हणून एक साधु देहूहून आला होता. आमच्या येसाजी निकमाने माझ्याजवळ त्याची मोठी स्तुति केली, तेव्हा मी त्याला शंभर रुपये त्या साधूपुढे ठेवण्यास दिले. तेवढ्यात तृप्त न होतां उलट त्याचा असा निरोप आला की, सरकारांतून आमांस कांही सालीना वेतन असावें.का आहेत का नाहीत साधु ? आतां एकदां देहूकर तुकारामबुवा म्हणून आहेत त्यांचा मोठा लौकिक ऐकतों आहे. बाकी मंबाजी तर तुकारामाला शिव्याच देत होता. त्यांना एकदां मंबाजीप्रमाणे कसाला लावून बघावयाचे आहे. पुष्कळ लोक त्यांच्या निष्कामबुद्धीचें वर्णन करितात. सई०-तुकारामबोवा हे खरे साधु आहेत बरें. त्यांचा छळ करूं नका. नाहीतर आपलें कल्याण होणार नाही. आपल्या रंगीच्या घरी लोहोगांवचे लोक पाहुणे आले होते. · ते सांगत होते की, तुकारामबोवा पैशाला शिवत नाहीत. नेहमी शांत स्वभाव. राग कसा तो ठाऊक नाही. ते पशुपक्षी मनुष्य स्थावर जंगम सर्वांला देवाप्रमाणे मानतात. मुखाने नेहमी हरिनाम चाललेले असते. दुसरा ध्यास नाही. -शिवाजी-असें जर आहे तर त्या पुण्यपुरुषाचे दर्शनाला असाच जाणार. असेल आपले नशिबांत तर लागतील त्यांचे पाय आपले घराला. त्यांची आपण मनोभावे सेवा करूं. संताची सेवा आपले हातून घडल्यास आपल्यास महत् पुण्य जोडणार आहे. संत आणि देव भिन्न नाहीत. संताचे अवतार जगाचे कल्याणाकरितांच आहेत. सई०-माझें बोलणे माझ्याच गळ्यांत आले. मी अगोदर जर तकारामबोवाची गोष्ट न काढते तर आतांच कशाला स्वारी निघाली असती? उद्यां गेलें तर नाही का चालायचे. शिवाजी-इतका माझ्या मनाला धीर नाही.