पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. ही गोष्ट काही आपल्या स्वाधीनची थोडीच आहे. अन्नपाणी वर्ज केले म्हणजे पुत्रप्राप्ति होत नसते. जगदंबेच्या कृपेने सर्व कांहीं मनाजोगें होईल. सई०-परवां भारतांतील जरत्कारू ब्रह्मऋषीची कथा निघाली होती. तेव्हां ज्यास संतान नसेल त्यांच्या पित्रांना गति नाही, त्यांचा उद्धार होत नाही, इतकंच नाही पण वांझेचा शकूनसुद्धां घेऊ नये, असें पुराणीकबोवांचे तोंडचे शब्द ऐकून मनाला फार वाईट वाटले. सासूबाईंनी तर दोनचारदा माझ्याकडे पाहून मोठ्याने उसासा सोडला. मग मेले मला आपलें चोरट्याचोरट्यासारखें वाट् लागलें. मुले होणे का कोणाचे हाती आहे ? देवानींच ती यावी अशी मनाची समजूत केली. पण हुरहुर लागली. ती कांहीं मनांतून जाईनाच. मी आणखी काय करूं ? रोज तुळसीची पूजा करतें. औदुंबराला प्रदक्षिणा घालते. अंबाबाईची पूजा करितें .उपासतापास, नेमधर्म करितें. नाही म्हणायला एक साधुसंताची पूजा-अर्चा करून आशीर्वाद घ्यावा, पण आपल्या येथे साधुसंत तरी कोण येणार आहेत ? (डोळ्यांत पाणी आणन ) माझ्या कपाळी असेल तसे होईल. शिवाजी-(तिचे डोळे पुसून) वेडी नाहीं तर. असाध्य गोष्टींबद्दल मनाला कधीही वाईट वाढू देऊ नये. हे बघ गोब्राम्हणांच्या, प्रजाजनांच्या आणि साधुसंतांच्या आशीर्वादाने काय होणार नाही ? परमेश्वराचे तेज, त्याचा चांगुलपणा, त्याची दया शांति, क्षमा सर्वव्यापकता, इत्यादि अनंत गुणांचा आपल्या निस्सिम भक्तीने अनभव घेऊन आमच्यासारख्यांना हा भवसागर तरून जाण्याक तां परमेश्वराच्या ठिकठिकाणी उत्पन्न झालेल्या विभुति आम्हाला उपदेश करण्याकरितां त्यांच्याच कपर्ने मिळतात. आपले गुरु एक श्री रामदास. खरे साधु. ते काही आपल्या हातून सेवा घेण्यास आपले घरी येऊन राहणार नाहीत. बाकीचे साधु म्हणजे जो उठतो तो पैशाकरितां आणि बायकांकरितां साधुपणाचे ढोंग माजवितो.