पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. शिवाजी-ह्मणजे हे काय बरें विनाकारण टोंचून बोलणें ? येथे असून अशा थोर माणसाच्या भेटीला आलों नाही असे मला तर कांही वाटत नाही. बाकी महत्वाच्या कामकाजांत गुंतलों असलों अगर बाहेरगावी गेलो असलो तर मात्र इलाज नाही. कोणीकड़न तरी भांडण काढून गोष्ट उडवावयाची. मी समजलों पण. सई०-गडे माझे डोळे आतां चुरचुर करीत आहेत. शिवाजी-तुला झोप येते, पण मला कोठे येते ? आईला ठाऊक आहे. तुला ठाऊक आहे. आतां मी आपला घरांत परका ह्मणायचा? मला काही समजू नये असें तुमचे मत. किती तरी आढेवेढे ? इतके आजव मी आजपर्यंत कोणाचेच केले नाहींत. खरोखर तुह्मां बायकांच्या मनांतली गोष्ट काढून घ्यावयाची ह्मणजे रेशमाची गांठ सोडण्यासारखी आहे. हं कळंद्याच काय आहे ते एकदां कसें ? सई०-आतां काय करावं ? काय तरी पण हा आग्रह. (लाजते), बरें तर सांगते. अं ! बायका सुंदर केव्हां दिसतात ? शिवाजी-नवन्यावर रुसल्या म्हणजे. नाही तर पुष्कळ डागिने घातले म्हणजे. यांत काय उघडच आहे. बायकांना डागिन्यांची हांव फार. डागिन्यांकरितां हवें तें करतील. सई०-कांहीं तरी बोलावे झाले. हे कांहीं माझ्या विचारण्याचे उत्तर नाही. सर्व कळते आहे. माणसाची उगीच थट्टा करायची झाले. माझ्या विचारण्याचा झोंक असा होता की, बायकांच्या साऱ्या जन्मांत त्यांना तेज कधीं चढते. शिवाजी-असें असें. गरोदर असतांना त्यांची रमणीयता विकास पावते. पण मला वाटतें जी सद्गणी स्त्री कडेवर बालक घेऊन देवाला जाते ती खरी सुंदर दिसते. सई०-झाले तर मग. आता आणखी काय बाकी सांगायचे राहिले ? शिवाजी-मग तुला का मुलासाठी खंती वाटते. त्यांत काय आहे?