पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. सई०-तिचे काय ऐकायाचें? ती आपली काही तरी बोलली. मला काय झाले आहे ? चांगली खातें, पिते, हिंडतें, वागते, चांगली आहे. शिवाजी-माणसांना रोगाचा प्रादुर्भाव होऊन तो वाढू लागला, ह्मणजे त्याच्या चर्या बदलतात. मग दुसरी माणसे त्यांना त्या रोगाच्या चिन्हांवरून तुम्हांला अमुक अमुक होत आहे, तर असें असें करा म्हणतात; पण मी ह्मणतों , चर्या बदलून रोग वाढण्याचे पूर्वीच बंदोबस्ताने जर त्याचा पाडाव केला, तर चांगलें नाहीं बरें? खरेंच पुसतों तुला काय होते? काय वाटते? सई-मला नाहीं कांहीं होत. शिवाजी-तर मग रंगू खोटेंच का बोलली म्हणावयाची? तुला कांहीं होत नाही अशी शपथ वहा. (जवळ घेऊन ) नाही पण मला कां सांगायला इतके आढेवेढे ? तुला का संसाराची काळजी आहे? का राज्य कसे प्राप्त होईल याची काळजी आहे ? माझ्या हातून काळजी निवारण होण्यासारखी असेल तर पाई सांग सांग काय तें. मई-आता काय करावे. तें कांही इकडे सांगण्यासारखें नाहीं. आणि ते माझ्याच्याने उघड करून सांगतांही पण येणार नाही. उगीच आग्रह कांहीं करूं नये. अवाजी-असे आहे तर मीही पण ऐकल्याखेरीज येथून उठणारच नाही. मीही पण हट्टीच आहे. पाहूं आतां मी हटतों की तूं हटतेस ? सई०-सासूबाईंनां सर्व माहित आहे. आतां मला झोप येते. मेली माणसांनी वाट तरी किती पहावी कोण जाणे ? थोडें लव या तर नाही चालायचे ? आतां दोनप्रहर रात्र उलटन ही मी किनई पहिल्यानदां बोलणारच नव्हतें. अगोदर पंधगपंधरा दिवस आमची आठवणच नाही. आमी मात्र चातक पक्षाप्रमाणे वाट पहात बसावें.