पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. सई०-मी आपला इकडच्याकरितां करितं आहे. शिवाजी-मला नाही तुमची भाषा समजत. तूं गजरा आणि हार कोणाकरितां चालविला आहेस ? तूं जसे तयार करते आहेस तसा मीही पण तयार करीत आहे. समजलीस ? सई-मी सरकाराकरितां तयार करिते आहे. आतां इकडून कोणाकरितां तयार होतात ते सांगायचं व्हावं. शिवाजी-तुमचे सरकार कोण ? ( सईबाई शिवाजीकडे बोट करिते, तो तिला तिचा हात धरून आपले शेजारी बसवितो.) तसेच आमच्या सरकाराकरितां आम्ही तयार करितों. तुमच्या सरकारापेक्षा आमच्या सरकाराला हा कितीपण शोभतो ( तिचे वेणीत गजरा घालतो.) सई०-कांही तरी बोलावें झालें. रंगू-(हात जोडून) महाराजांपाशी थोडा अर्ज आहे. आतांशा बाईसाहेब अन्न खात नाहीत, नेहमी आपल्या दुर्मुखलेल्या असतात. त्यांना कोणत्या गोष्टींत आनंद वाटत नाही. थोरल्या आईसाहेबांनी सुद्धां पुष्कळ वेळ विचारिलें कीं, असें कां, पण कांहीं बोलतच नाहीत. __सई०-रंगे, तुला कोणी इतकी पंचाईत सांगितली गे? उगीच मध्ये लुवन्यासारखें बोलावें? तुला कोणी विचारले कां होते ? मध्येच विचारल्याशिवाय बोलू नये. तुम्हांला कसे समजत नाही? (त्यांना जाण्यास खूण करिते, त्या जातात.) शिवाजी-चाकरमाणसांशी कसें प्रेमाने वागावें ! तिला वाटलें मला सांगावेसें यांत तिची चूक आझाला नाही दिसत. त्यांची आतां येथें जरूरी नाही ह्मणून हळूच जायला जसे सांगितलेंस तसेच आपल्याला शब्दांनी खास प्रेम दाखविता येते. असो ह्मणा, ती माणसें तरी आपलीच आहेत. त्यांच्यावर आपली ममता असणारच. पण रंगू आता काय ह्मणत होती? तं अशी उ. दास कां, जगदंबेच्या कृपेने आपल्याला काय कमी आहे ?