पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. इकडे ध्यानात येत नसेल, पण झोंपी गेलेल्याला जागे करता येते. इकडे का हे समजत नसेल. आपले पुराणीकबुवा असे सांगत होते. एक दिवस सावित्रीआख्यानाची कथा पुराणांत निघाली होती. त्यावेळी त्यांनी असे सांगितले की, बायकांचे दैवत पति. म्हणून मी ह्मणतें. शिवाजी-बायकांचे दैवत पति, मग सावित्रीने आपला पती जीवंत व्हावा ह्मणून यमाची प्रार्थना का केली ? मग तिने आपला पति जीवंत करावा की नाही ? सई०-सर्व काही इकडे कळत आहे, पण आमची उगीच परीक्षा करावयाची झाले. आझाला बोलण्यांत अडवायचे. आमाला कांहीं कळतच नाही. झालें आतां ? शिवाजी-नाही नाही, मी काही तशा बुद्धीने विचारीत नाही. मला खरोखरच अशी शंका आली की, सावित्री ही जर महापतिव्रता होती, आणि स्त्रियांना पति हे जर मुख्य दैवत आहे, तर मग सावित्रीला आपल्या पतीचे प्राण वाचविण्याकरितां यमाची प्रार्थना काय ह्मणून करावी लागली ? सई०-झणजे असे कसें ह्मणायाचें ? सावित्री पतिव्रता होती, यणन यम स्वतः आला. तिने यमाची प्रार्थना केली, तो प्रसन्न झाला. त्याने तिला चार वर दिले. पतिव्रता ती होती, ह्मणून तिचा पति जीवंत झाला. शिवाजी-असें नाही. आपण थोडे चुकलांत. आपल्याला. पराणांतलें तत्त्व कळले नाही. राग नका येऊ देऊ. स्त्री किती जरी महान साध्वी झाली तरी तिला परमेश्वराचे स्वरूपाचे ज्ञान असलेच पाहिजे. द्रौपदी मोठी पतिव्रता होती, परंतु श्रीकृष्ण पमाल्याचे ठिकाणी अनन्य भावाने शरण होती. त्यानेच तिला असंख्य संकटांतून मुक्त केले. (एक गजग तयार करितो.) मई-तें असो. पण हा गजरा कोणासाठी चालला आहे ? शिवाजी-झणजे? आपला कोणाकरितां चालला आहे?