पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

N - अंक १ ला. १३ मागायला गेले की, मेला ह्मणतो फुल हैती कुठं ? समदी फुलं गेली देवाला. . रंगू-बाईसाहेब हे एकदां सरकारचे कानावर घातलेच पाहिजे. परवां देवाचे उत्सवाचे वेळी सरकारांनी त्या राम्याला एक शेत इनाम करून दिलेले आहे, तेव्हापासून तो फार शेफारून गेलेला आहे. आह्मी बागेत गेलों की, एकदम आमच्यावर तोंड टाकितो. सई०-असल्या हलक्यासलक्या गोष्टी सरकारचे कानावर मी कधीच घालीत नाही. अगोदर स्वारी नेहमी स्वायशिकाऱ्यांत गुंतलेली, त्यांतून फुरसतीअंती एखादे वेळी इकडे येणार, तों आमी त्यांचे पुढे काही तरी रडकथा सांगत बसावे, यांत कांहींच अर्थ नाही. त्या माळ्याचा बंदोबस्त करावयाला सरकार कशाला पाहिजेत? त्याला एकदां ताकीद देऊं. एवढ्याशा फुलांत एक हार व दोन गजरे होणार तरी कसे ? (शिवाजी प्रवेश करतो.) शिवाजी-(ऐकलेसे करून ) शहाण्यासवरत्या माणसांना माणसें ह्मणजे माणसें तीं कांहीं देव नाहीत हे का समजत नसते ? देवाच्या पूजेला धूप दीप फुले लागतात आणि माणसाचे पूजेला एकच पुष्प पुरे असते. सई०-कां बरें, माणसें का देव नाहीत. बायकांना पतिच देव आहेत, त्यांना इतर देवतांहून नवरदेवच जास्त पूज्य आहेत. शिवाजी-आपल्याला अमें ह्मणावयाला थोडेच आधार सांपडतील. सई०-थोडे काय ह्मणून अठरा पुराणांत बायकांनी सार काढावयाचें तें हेंच. जागजागीं साध्वींच्या कथांतून याच गोष्टी चटकदार रीतीने कशा पण दाखविल्या आहेत ! पुराणीक बोवा वाचं लागले झणजे धर्मार्जुनांनी, रामरावणांनी, अहिमहींनी, जरासंधभीमांनी, किंवा भीष्मद्रोणांनी केलेल्या पराक्रमाकडे इकडून पहावयाचे होते. पण आमी सीता, मंदोदरी, अहिल्या, द्रौपदी, तारा, सावित्री, सुभद्रा, रुक्मिणी यांच्या कथांकडेच पाहतो. हे का