पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. मंबाजी-कांहीं तरी त्याच्या शरीराला शिक्षा झाली पाहिजे. त्याचा हात कलम केला पाहिजे. अहो, वह्या बुडवून टाकल्या किंवा जाळून टाकल्या म्हणजे त्याचे तोंड कांहीं बंद पडत नाही. हात टाळ वाजवितांना राहत नाहीत. चांगल्या बडग्याखाली यथेच्छ धोपटून काढावा म्हणजे झाले. त्याला शिवाजी कशाला आणि शंकराचार्य कशाला ? रामेश्वर-तें काम तुह्मी करा. तुझी आणखी तो एका गांवचे आहांत. वह्या बुडविण्याचे काम आह्मी करतो. चला तुमचा आमचा बेत ठरला. द्या वचन. मंबाजी-हें घ्या वचन. नित्यानद (३ घ्या आमचे वचन. सदानंद प्रवेश ३ रा. स्थळ-सईबाईचा रंगमहाल. ( सईबाई आपल्या दासीसहवर्तमान मोतियाचे फुलांचे गजरे करीत बसली आहे.) सईबाई-काय गे रंगू, आज इतकी थोडी कांगे फुलें ? यांत सरकारचे दोन गजरे आणि हार कसेगे होणार ? रंगू-बाईसाहेब, आज फुलं आणावयाला मी नव्हतें गेलें, गंगू गेली होती. कायग गंगे, तुला ऐकू नाहीं कां आलें, बाईसाहेब काय ह्मणाल्या त्या ? गंगू-(रंगूस दरडावून ) माझे कांहीं कान फुटले नाहींत समजलीस ? (नम्रपणे ) बाईसाहेब, तो आपला रामजी माळी आतांशा माझें ऐकतच नाही. बाईसाहेब, तो किनई सरकार अंबाबाईला जावयाला लागले ह्मणजे तेवढा पुढे पुढे करितो. सरकारला मनाजोगी फुलें देतो, आईसाहेबांना मनाजोगी फुलें देतो. मी ५