पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. बसला आहे. आज सात दिवस झाले. आतां त्याला खावयाला कोण नेऊन देतो, तें पहातो. त्याला वाटले हा मंबाजी बुवा बनला, आपणही बुवा बनावें. पण या मंबाजीच्या नखाची तरी तुला बरोबरी होणार आहे का ? त्याची चांगली एकदां फजीती उडवायची आहे की, अरे गाढवाच्या लेंका, तूं जातीचा शुद्र, तुला गीता, भागवत हवें कशाला ? गीता वाचीत असतो. वेदांतली वाक्ये अभंगांत आणण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला निदान या देहू गांवांतून तरी हांकून दिलाच पाहिजे. येथे एका म्यानांत दोन सुन्या असल्याप्रमाणे झाले आहे. मी साधु आणखी तोही साधु. मला कोणी पुसेनासे झाले आहे. त्याची मात्र लब्धप्रतिष्ठा वाढत चालली आहे. ( सुंदराजी प्रवेश करिते.) सुंदराजी-(त्याच्या पायां पडून) काय चालले आहे बोबासाहेब ? मंबाजी--सुंदराजी, तुमची मी रात्रंदिवस सारखी वाट पहात आहे. मला काही तुमच्या घरी येतां येत नाही. ह्मणजे मनानें येण्याला काही हरकत नाही. कारण शिष्याच्या घरी जाण्याला गुरूला केव्हाही हरकत नाही असा शास्त्राधार आहे. पण जनलज्जेकरितां येतां येत नाही. सुंदराजी--पण साधूंनां जनलज्जा तरी कशाला ? गुरूचे पाय माझ्या घरी लागावे, अशी रात्रंदिवस इच्छा करिते. आपण सांगितल्याप्रमाणे गुरुदक्षणेचे रुपये पंचवीस, गुरूकरितां शेलापागोटें, पंचपक्वानांचा शिधा, आणखी पूजेचे साहित्य सर्व काही आणिलें आहे. त्याचा स्वीकार करावा. आणखी मला उपदेश द्यावा. मंबाजी-ठीक आहे. सामान सर्व तूर्त आमच्या बि-हाडी ठेवन जा. एकादा चांगलासा दिवस पाहून तुह्मांला गुरूपदेश करूं. परंतु गुरुदक्षणा जी नुसती पंचवीस रुपये आणली आहे. तिचा तर मी स्वीकार करतोच, परंतु त्याशिवाय आमचें एक फार नाजूक काम तुम्हीं केले पाहिजे. सुंदराजी-आपली शिष्यीण झाल्यावर कोणतेंहि काम मला