पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. करावयाला सांगण्याचा आपल्याला अधिकारच आहे. गुरुमहाराजांची सेवा होणे ह्या कपाळी पाहिजे. मंबाजी-तुमचा स्वभाव फारच मनमिळाऊ आहे. आजपावेतों पुष्कळ आमच्या शिष्यिणी झाल्या, परंतु तुमच्यासारखी आज्ञाधारक एकसुद्धां मिळाली नाही. आमचे एवढे जर तुझीं नाजूक काम केले, तर आम्हावर तुमचा मोठा उपकार होणार आहे. इतकेच नाही पण परमेश्वरावर सुद्धा तुमचा मोठा उपकार होणार आहे. सुंदराजी-पण या आज्ञेला इतके आढेवेढे कशाला ? बोलण्याचा उशीर की केलेच ह्मणून समजा. मंबाजी-तुकारामाविषयीं तुमचे काय मत आहे ? सुंदराजी-बुवासाहेबांचे काय मत आहे ? मंबाजी-माझ्या मतें तो अगदी ढोंगी आणखी पाजी मनुष्य आहे. या गांवचे लोक विनाकारण त्याचे स्तोम माजवीत आहेत. माझ्या मनांत त्याची चांगली फजीती करावयाची आहे. तेव्हां या कामी तुमची योजना करावी, अशी माझी इच्छा आहे. (हळच) तुह्मी त्याला असा नादी लावतां कीं, मेनकेने जसें विश्वामित्राचें कुत्रे करून त्याला आपल्यामागे नेला, तसें तुह्मी त्याचे कुत्रे करून त्याला आपल्या मागे मागें या गांवचे लोकांचे घरीं हिंडवा. संदराजी-मग खरेंच सांगू का ? माझ्या मनांत तर ही गोष्ट आज कैक दिवस घोळत होती, त्यांतून आज या तुमच्या गुरूपदेशाने तर आतां ही गोष्ट मी फारच आनंदानें करीन. कारण स्वामीची आज्ञा सेवकाला प्रमाण. तुकाराम कदाचित् साधु असलाच, तर त्याचे सत्वाचा भंग केल्याचा दोष आतां मजकडे नाही. मंबाजी-मी घेतों सर्व पाप आपल्या माथीं. त्याची काळजी तुझांला नको. सुंदराजी-ठीक आहे. चांगलीशी संधि पाहून हे काम उरकून टाकतें. (रामेश्वर व दोन संन्यासी प्रवेश करितात. सुंदराजी जाते.)