पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. त्याचप्रमाणे या संसाररूपी काळकूट विषाने या तुकारामाचे अंगाचाही डोंब झाला आहे. बरे झाले माझें दिवाळे निघाले. तशांतून या दुष्काळाने तर मजवर फारच उपकार केले म्हणायचे. सगळ्या जगांत माझी फजीती चालली आहे. सगळे लोक अपमान करीत आहेत. किती आनंदाची गोष्ट आहे बरें! सर्वांत आनंदाची गोष्ट ही झाली की, अशी कर्कशा बायको देऊन पांडुरंगाने माझ्या आनंदाचा कळस केला. (जिजाईला व मुलांना बाजूला लोटून तुकाराम भांबनाथ पर्वतावर निघून जातो ). प्रवेश २ रा. स्थळ-देहू येथील मंबाजीचा मठ. मंबाजी--तुकाराम जातीचा कुणबट, मनाने हलकट, आह्मी ब्राह्मण श्रेष्ठ, आमची लाथ प्रत्यक्ष श्रीविष्णूला सहन करावी लागली, तो इतरांची काय कथा ! नुसत्या आळंदीपंढरीच्या वाऱ्या केल्या, ह्मणजे साधु बनत नाही. तुकाराम वाणगटाचा धंदा करीत होता. प्रत्येक धंयांत अकल पाहिजे तर त्यांत बरकत येते. तुकारामाने मिरच्याचा व्यापार केला, त्यांत कांहीं रुपये मिळाले, ते मूर्खाने एका भामट्याला देऊन त्याच्यापासून सोन्याची ह्मणून मुलामा दिलेली पितळेची कडी घेऊन आला. येथें सुलाख लावण्याबरोबर गांवकांत कोण हंशा ! दुसरे खेपेस गुळाचा व्यापार केला. अडीचशे रुपये घेऊन आला. ते वाटेत एका मालेविक्या भिकारड्याला देऊन त्याच्या गळ्यांतला नांगर काढविला. अडीचशे रुपये पाण्यात गेले. बायको जरा श्रीमंतांची मुलगी मिळाली आहे, ह्मणून याच्या पोटाला मीठभाकर मिळते. पण तीहि आतां याच्या संगतीला कंटाळून गेली आहे. आतां तुकारामाने साधूपणाचे ढोंग माजविले आहे. भामनाथ डोंगरावर जाऊन उपाशी