पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. जिजाई-दम धरा मेल्यांनों. मला त्या काळ्याचे पोवाडे नकोत. त्याने काही माझ्या मुलांचें पोट भरत नाही, समजलांत ? खायला आणा, नाही तर त्या काळ्याच्या पायांवर ही दोन कारटी नेऊन त्यांची कपाळे आपटते आणखी मीहि पण त्याच्या पायावर धडक घेऊन प्राण सोडतें. झक मारतो तो काळ्या. तुकाराम-(तोंडांतून ) पांडुरंगाचें नांव तरी निघतें आहे का ? काळ्या ! काळ्या !! काळ्या ! ! ! तुला त्याची गरज नाही, तर मलाही पण तुमची गरज नाही. हा मी चाललों. ( जाऊ लागतो, त्यास जिजाई, काशी, महादेव ओढून आणतात.) जिजाई-चाललांत कोठे ? तुम्हांला जाऊन देणार नाही. लग्न लावून नुसते मंगळसूत्राला धनी कशाला झालांत ? तुम्हांला ह्या जिजाईचा स्वभाव अजून कळला आहे कोठे ? आमची खाण्याची सोय लावा. आणखी मग जा त्या काळ्याच्या नांवाने ओरडायला. तुकाराम-पांडुरंगा, तेरा वर्षांचा झालों नाहीं तोंच आईबापांनी संसाराची बिडी पायांत ठोकली. दोन बायका करून दिल्या. सतरावे वर्षी आईबाप सोडून गेले. वडील बंधूचे कुटुंब घरांत दक्ष बायको होती ती सुद्धा बिचारी वारली; बंधु विरक्त होऊन उठन गेले. त्यांचा वियोग मनाला सहन होईना. तोच धाकटा भाऊ कान्हया पोटामागें भटकत फिरूं लागला. पुढे भयंकर दुष्काळ पडून ज्येष्ठ पत्नी, स्वभावाने अत्यंत गरीब, आणि ज्येष्ठ चिरंजीव संताजी, ज्यांच्यावर माझें अत्यंत प्रेम त्या दोघांनी अन्न अन्न करून तडफडून प्राण सोडले. नंतर या तुकारामाचे दिवाळे निधन संसाराची वाताहात झाली. मलाहि संसाराचा वीट आला. अज्ञानरूपी रात्र संपून गेली. ज्ञानाचा प्रकाश या हृदयांत पडू लागला आहे. बरोबरच आहे. समुद्रमंथन केल्यावर शेवटी जसें अमत निघालें, किंवा शंकराने हलाहल प्राशन केल्याने त्याच्या सर्वांगाचा भडका झाला, आणि मग राम नाम त्यांच्या मखीं आलें..