पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

" अंक १ ला. लोळले म्हणून त्याच्या मनाला काही अनुताप होणार आहे का ? या वर्गातीलच तुमची जमा. तुमचे म्हणणे असे की, साप अन्न खात नाही म्हणजे तो आपली एकादशीच करतो, किंवा दगड बोलत नाही म्हणजे तो आपला योगीच बनला. पुणेकर अप्पा गुळव्याची मुलगी गोड गोड भाषणे बोलली. जिजाई-हाँ खबरदार, माझ्या बापाचें नांव घेतलेत तर. तुमच्या घरी तो कांहीं पाणी भरायला आला नाही समजलांत ? कोणीकडून तरी भांडण काढून निघून जायाला पाहिजे. शेर अच्छेर पीठ आणले होतें विकत, ते घातले त्या मंबाजीच्या डोसक्यावर. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी अघळपघळ सांगतां येतात, मी सुद्धा सांगतें पाहिजे असेल तर; पण आतां या पोरांच्या पोटाची काय वाट ? यांच्यापुढे मी आपले हातपाय तोडून टाकं वाटते खायला ? तो मेला पंढरीचा काळ्या देतो आहे का आतां शेरभर दाणे ? माझ्या बापाला समजले तर तोच मात्र आणून देईल ! तुकाराम-काही नाही, माझा पांडुरंगच देईल. तुझ्या बापाला तरी तोच बुद्धी देणार आहे. पांडुरंगाची भक्ति केल्यावर कांहीं कमी पडणार आहे का ? चोखामेळा जातीचा महार, त्याच्या येथे पांडुरंग मेलेली गुरे ओढू लागला, त्याच्या सांगत बसून जेवायला लागला. श्री ज्ञानेश्वरासाठी निर्जीव भिंत चालविली. रेड्याचे तोंडांतून वेद बोलविले. दामाजीसाठी महार होऊन बादशहाचे दरबारी रसद भरली. एकनाथाच्या घरी कावडीने पाणी भरलें. लोक फक्त दिवटीच्या प्रकाशाची इच्छा करितात, औषधाकरितां वनस्पतीचा शोध करितात; पपा आमच्या पूर्वजांनी दिवटीच्या ऐवजी पांडुरंगरूपी प्रत्यक्ष सूर्यच पैदा करून ठेविला आहे, आणखी औषधांच्या ऐवजी अमृताचे कुंडच जोडून ठेविलें आहे. त्याला तूं लाथेनें लवंडून देणार वाटतें ? काशी महादेव-भूक लागली.