पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीतुकाराम. बाने नानाप्रकारची कमळे आह्मांला वाहण्याचा विचार केला आहे वाटते. अगे अजून काय झाले आहे ? आतांशी तर आरंभ आहे. अज्ञानरूपी रात्र संपून जाऊन या तुकारामाचे अंतःकरणांत ज्ञानाचा प्रकाश किंचित् पडत चाललेला आहे. आज महापूजा बांधण्याचा विचार आहे वाटते ? मला हवे तितकें बोल. चोर, ह्मण, दुष्ट ह्मण, टाळकुट्या ह्मण, वाटेल तें म्हण, पण त्या पांडुरंगानें तुझें काय केले आहे ? त्याला काय ह्मणून शिव्या ? जिजाई-काय म्हणून शिव्या ? लाखोली घालीन. या मेल्या काळ्याच्या नादी लागून आजपर्यंत कोणाचे कल्याण झाले आहे ? घ्यामाप पदरांत. नारदानें भक्ति केली, त्याची नारदी करून सोडली. मारुतीनें भक्ति केली, त्याला वानरचेष्टा म्हणतात. गरुडानें भक्ति केली, त्याला सापखाऊ म्हणतात. सांभानें भक्ति केली, त्याला मसणवाट्यांत नेऊन बसविला. बिभीषणानें भक्ति केली, त्याचा भाऊ रावण एवढा पराक्रमी मारून टाकला. पांडवांनी भक्ति केली, त्याबद्दल द्रौपदीला सभेत नग्न केलें. अंगदाचा बाप, प्रल्हादाचा बाप ठार मारले. आणखी दुसऱ्याचे दृष्टांत कशाला, माझ्या संसाराची धूळधाण केली, माझें घर घेतले, माझा घरधनी डा केला. झाली का आतां मनाची खातरी ? सोडा आतां त्या काळ्याचें नांव, आणि वाला संसारांत चित्त. तुकाराम-अहाहा! काय पण उपदेशाचा परिणाम झाला या तुकारामाचे मनावर ! आतां आमची भक्तिरूपी नांव या संसाररूपी मृगजळाच्या डोहांत बुडून ठार झाली. वाऱ्याने पर्वत उडन जाऊन अस्मानांत गिरकांड्या खावयास लागले. ह्या पहा वांझेच्या मुलांच्या जन्मपत्रिका पाहण्याकरितां ज्योतिष्यांच्या झुंडींच्या झंडी लोटल्या. आकाशाला आलेली फुले पोराबाळांनी तोडून, पायाखाली तुडवून त्यांचा चुराडा केला. इतका तुझ्या उपदेशाचा ठसा माझ्या मनावर वठला आहे. इतकी पुराणांतली उदाहरणे देऊन त्यांच्यापासून हेच सार काढलेंस वाटते ? भस्मांत गाढव