पान:श्रीतुकाराम (ऐतिहासिक नाटक).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. मंबाजी बोवा गोसावी नव्हेत का ? अहो, आमच्या घरांत मुळी दाणेच नाहीत, तों पीठ कशाचें आलें ? जिजाई-मंबाजी असो, नाही तर संभाजी असो. तुला कोणी सांगितली इतकी पंचाइत ? चल चालता होरे डोईफोड्या येथून. मोठे मेले साधु आले आहेत. घातला एक माळेचा हायकोल गळ्यांत की बनले साधु. - मंबाजी-नही अम्मा. ओ लडका महादेव सच कहता है के तुमारे घरमे आटा नहीं. बेटा ये ले आटा. जिजाई-अरे जा मेल्या भिकारड्या. आपण भीक मागतो आणखी आह्मांला पीठ आणून देतो. तुझ्यासारख्या शंभर गोसावड्यांनां जेवावयाला घालण्याचें आह्मांला सामर्थ्य आहे समजलास ? ( तुकाराम पुढे येतो.) तुकाराम-हें घे पीठ. ( मंबाजीच्या तुंब्यांत पीठ ओततो.) साधुसंतांशी काय असें हुंबरातुंबरीला यावें. देवाच्या दयेने आपल्याला काही कमी आहे काय ? ( मंबाजी जातो.) जिजाई-घातलें का त्याच्या डोंबलावर तेवढे पीठ ? आतां पोरांनां काय आपली हाडें खायाला घालूं ? ( तोंड वांकडे करून ) आपल्याला ह्मणे कांहीं कमी आहे काय ? सगळे घर लोकांनां देऊन देऊन जसें धुवन टाकले. घरांत सारवायला शेणसुद्धा राहूं देत नाहीत. पूर्वजन्मीचे दावेदार आहांत. वैर साधायला मला पदरीं बांधलीत. लोकांपुढे मी किती तरी तोंड वेंगाडावें ? आपण नदीत जाऊन बोडकें तिंबावें, गळ्यांत माळेचें लोहडणे अडकवावें, देवळांत जावें, त्या मेल्या काळ्याच्या नांवानें तोंडाची बचळी वासून टाळ कुटावेत, उदीमव्यापाराच्या नांवानें भोपळ्याएवढें पूज्य. या मेल्या संतांनां कांहीं शरम आहे का !!! मेले लाज वाटून प्याले आहेत जसे कांही. यांच्या बायका यांच्या नांवानें खडे फोडतात. तुकाराम-आजची पूजा विशेष आहे. आज आमच्या कुटुं